शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘तडजोड’ शक्य नसल्याने त्रागा

By admin | Updated: August 20, 2016 00:17 IST

अतुल काळसेकरांचा आरोप : मंत्र्यांच्या पारदर्शक कामकाजामुळे ठेकेदार अडचणीत

कणकवली : बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी भाजपाच्या शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. या खात्यांतर्गत पारदर्शक कारभार करण्याच्यादृष्टीने मंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच ठेकेदार अडचणीत आले आहेत. असे सांगतानाच महाराष्ट्रातील डीएसआर कमी असल्याने रस्त्यासह अन्य कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे ठेकेदार संघटना सांगत आहे. मात्र, यापुढे कोणतीही ‘तडजोड’ करणे त्यांना शक्य होणार नसल्यानेच एकप्रकारे त्यांना ही उपरती झाली आहे. असा टोला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.येथील भाजपा संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभाकर सावंत, राजन चिके उपस्थित होते.अतुल काळसेकर म्हणाले, ठेकेदार संघटनेने शासकीय कामांवर बहिष्कार घोषित केला आहे. महाराष्ट्रातील ‘डिएसआर’ कमी असल्याने रस्त्यांची तसेच अन्य कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या भूमिकेचे भाजपाच्यावतीने आम्ही स्वागत करतो. मात्र, त्यांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. ‘डिएसआर’ बाबतचा त्यांचा आरोप समजून घेण्यासाठी गेल्या सहा वर्षांतील कामांच्या निविदांची माहिती घेतली. त्यावेळी असे दिसून आले की सावंतवाडी तसेच कणकवली बांधकाम विभागांतर्गत ज्या ठेकेदारांनी कामे घेतली होती. ती निविदेच्या अंदाजीत रकमेपेक्षा १0 ते १२ टक्के कमी दराने घेतलेली आहेत. तर काही ठेकेदारांनी पुलांची कामे २७ टक्के कमी दराने घेतलेली आहेत. मग महाराष्ट्रात जर ‘डिएसआर’ कमी असेल तर कमी दराने ठेकेदारांनी ही कामे कशी घेतली ?डिएसआरचा शासनाने पुनर्विचार करावा अशी ज्यावेळी मागणी केली जाते. तेव्हा मागील निविदांचा अभ्यास केला जात असतो. हे लक्षात घ्यायला हवे. काही ठेकेदारांनी कमी दराची निविदा भरताना विविध कारणे दिली आहेत. त्यामध्ये सर्व मशनरी स्वत:ची असून मजूर काम नसल्याने बसून आहेत. क्वारी स्वत:ची आहे, हॉट मिक्सिंग प्लांट स्वत:चा आहे अशा कारणांचा समावेश आहे.त्याचबरोबर कामासाठी लागणाऱ्या विविध साहित्याचे दर वाढले असे कधीही या संघटनेने निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांना अथवा शासनाला कळविलेले नाही. त्यामुळे आता सांगण्यात येणारी कारणे किती खरी आहेत? असा प्रश्न निर्माण होतो.गोव्याबरोबरच इतर राज्यातील रस्ते पाहिल्यानंतर आपल्या रस्त्यांचा विचार मनात येऊन मान खाली जाते. रस्त्यावरील कारपेटसाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराचे प्रमाण ३ टक्के असते. तर गोव्यात ते प्रमाण ३.२५ टक्के असते. हे ३ टक्के प्रमाण जरी व्यवस्थित ठेवले तरी ठेकेदार संघटनेला आता जे हास्यास्पद स्पष्टीकरण द्यावे लागत आहे ते द्यावे लागले नसते. (वार्ताहर)शासन सकारात्मक : बांधकाममंत्र्यांकडून खड्डे बुजविण्याचे आदेशभाजपाचे शासन सकारात्मकच असून मागील कामांचा तसेच नवीन कामांसाठी बांधकाम विभागाच्या दोन्ही विभागांना निधी उपलब्ध झाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी बैठक घेऊन २५ आॅगस्टपूर्वी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही महामार्ग प्राधिकरण तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा नुकताच आढावा घेतला असल्याचेही अतुल काळसेकर यावेळी म्हणाले....अन्यथा ‘बांधकाम’ने नोटीस काढावीअनेक ठेकेदार कामाच्या ठिकाणी दोषनिवारण कालावधी असलेला फलक लावत नाहीत. तो फलक लावणे आवश्यक आहे. अन्यथा बांधकाम विभागाने त्यांना नोटिस काढावी. असे झाले तर जनतेलाही एखाद्या कामाचा दोष निवारण कालावधी समजू शकेल आणि संबधित ठेकेदाराकडून परत काम करून घेता येईल. असेही काळसेकर यावेळी म्हणाले.