शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या पिशव्यांचा आधार

By admin | Updated: August 3, 2014 22:47 IST

भविष्यात संकट : गोव्याच्या हद्दीवरील डाव्या कालव्याला भगदाड

वैभव साळकर-दोडामार्ग , तिलारी प्रकल्पाचे गोव्यात पाणी वाहून नेणारे महाराष्ट्र हद्दीतील कालवे निकृष्ट असल्याचा आरोप वारंवार गोवा राज्याकडून होत असताना हे कालवा निकृष्टीचे ग्रहण गोव्यातील कालव्यांना लागल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. महाराष्ट्र-गोवा हदद्दीवर असलेल्या मुख्य डाव्या कालव्याला भेगा गेल्या असून त्याला चक्क पिशव्यांमध्ये माती भरून आधार देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कालवा फुटीचे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी प्रकल्पस्थळापासून उजवा आणि डावा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याबाहेर तर उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले जाते. डावा कालवा महाराष्ट्र-गोवा हद्दीवर बिचोली तालुक्यात प्रवेश करतो. या कालव्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. महाराष्ट्र हद्दीत अनेक ठिकाणी कालवा फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांच्या कामाबाबत गोवा राज्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोव्याचे जलसंपदामंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही गतवर्षी कालव्यांची पाहणी केली होती. त्यामुळे तिलारीचे कालवे एक चर्चेचा विषय बनला होता. मात्र, आता असाच प्रकार गोवा हद्दीतही पहावयास मिळतो आहे.कालव्याच्या वरच्याबाजूने डोंगर असून या डोंगराचे पाणी पावसाळ्यात खाली वाहून येते. त्याचा निचरा होण्यासाठी कालव्याखालून मोरी बांधणे आवश्यक होते. परंतु तसे न करता त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. हे पाणी सातत्याने त्या ठिकाणी आतमध्ये झिरपू लागल्यानेच कालव्याला भेगा पडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.