शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

बांदा ग्रामस्थांचाही मायनिंगला विरोध

By admin | Updated: December 10, 2015 00:47 IST

ग्रामसभेत निर्णय : अन्य विषयांवरही चर्चा, जानेवारीत विशेष सभा होणार

बांदा : झपाट्याने विकसीत होत असलेल्या व बांदा शहराच्या मुळावर येणाऱ्या प्रस्तावित खनिज प्रकल्पाला बांदा ग्रामसभेत देखिल विरोधाची भूमिका घेण्यात आली. बुधवारी घेण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत मायनिंगविरोधी ठराव घेत यासंदर्भात बांदावासियांची मते जाणून घेण्यासाठी येत्या ५ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या आजच्या ग्रामसभेत शहरातील विविध विषयांवर वादळी चर्चा झाली.तहकूब ग्रामसभा बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ग्रामपंचायत सभागृहात अरुण मोर्ये यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सुरुवातीलाच बांदा शहरातील अतिक्रमण, कचरा डेपोची समस्या, वाहतूक कोंडी, वाढिव घरपट्टी, शहरातील विविध विकासकामांसाठी झालेला खर्च, सीआरझेड, विविध शासकीय योजनांमधून करण्यात आलेली कामे यासंदर्भात वादळी चर्चा झाली. विशेष ग्रामसभा पाच जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात घेण्याचे निश्चित करण्यात आले.हनुमंत आळवे यांनी स्मशानभूमित करण्यात आलेल्या कचरा डेपोबाबत नाराजी व्यक्त केली. यामुळे याठिकाणी दुर्घंधिचे साम्राज्य पसरले आहे. याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी केली. यासाठी दोन शासकिय जागा निर्गमीत केल्या असून या जागांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले. तसेच वाढिव घरपट्टीबाबत ग्रामस्थांच्या हरकती मागविण्यात आल्या असून त्या शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. माजी सरपंच श्रीकृष्ण काणेकर, गुरुनाथ सावंत, हनुमंत आळवे, सुरेश गोवेकर, संदेश भोगले, बाळु सावंत, गुरुनाथ सातोस्कर यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी विविध विषयांवरुन सत्ताधारी व ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली.२0१५-१६ सालचे ग्रामपंचायतीचे एकूण वार्षिक अंदाजपत्रक हे १ कोटी ८२ लाख रुपयांचे होते. त्यातील १ कोटी ६७ लाख एकूण खर्ची करण्यात आलेत. तसेच २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी १0 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचे ग्रामसेवक संदिप बांदेकर यांनी सांगितले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला सुमारे ५0 ग्रामस्थ उपस्थित होेते.यावेळी माजी सरपंच शितल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अशोक सावंत, राजा सावंत, हुसेन मकानदार, अपेक्षा नाईक, रिमा गोवेकर, लक्ष्मी सावंत, अनुजा सातार्डेकर, रत्नमाला वीर, सरीता धामापूरकर, मनाली नाईक, तलाठी एम. एन. मयेकर, पोलीस पाटील चंद्रकांत कदम, तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर खान उपस्थित होेते. (प्रतिनिधी)स्थानिकांचा रोष : कल्याणकर४बांदा शहरातील अतिक्रमामुळे वाहतुकीची कोंडी होते असा प्रश्न हनुमंत आळवे व संदेश भोगले यांनी उपस्थित केला. मात्र, यापूर्वी अतिक्रमण हटविताना स्थानिकांच्या रोषाला ग्रामपंचायत प्रशासनाला सामोरे जावे लागत असल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले. त्यावेळी या विषयावर वादळी चर्चा झाली. ग्रामपंचायतीने संपूर्ण शहरातील अतिक्रमण आपल्या अधिकारात हटवावे असा ठराव घेण्यात आला. त्यामुळे लवकरच अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे.