शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वेर्ले अपहार प्रकरणात बड्यांचा हात

By admin | Updated: October 9, 2016 23:34 IST

पोलिसांना संशय : उपसरपंचांचा जबाब नोंदवला

सावंतवाडी : वेर्ले येथील शौचालय घोटाळ््याप्रकरणी ग्रामसेवकासह सरपंचावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात आणखी काही बडे लोक असल्याचा संशय पोलिसांना असून, पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सरपंचासह ग्रामसेवक अटकेच्या भीतीने पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी वेर्लेचे तत्कालीन उपसरंपच चंद्रकांत राणे यांचा जबाब नोंदविला आहे. वेर्ले येथील शौचालय घोटाळ््याप्रकरणी पंचायत समितीच्या तक्रारीवरून वेर्लेच्या बडतर्फ सरपंच प्रमिला मेस्त्री व ग्रामसेवक केतन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तब्बल ३५ लाखांचा अपहार झाला असल्याचे पंचायत समितीने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात या दोघांव्यतिरिक्त अन्य काहींचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. एक महिला एवढे धाडस करणार नसून, ग्रामसेवकाला हाताशी धरून अन्य सदस्यान किंवा पदाधिकाऱ्याने सह्या मारून हे पैसे उकळल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच प्रमिला मेस्त्री व केतन जाधव यांच्या मार्गावर होते. स्वत: पोलिस उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांनी वेर्ले व वेंगुर्ले येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला. पण आरोपी सापडले नाहीत. रविवारी या अपहारप्रकरणी वेर्लेचे तत्कालीन उपसरपंच चंद्रकांत राणे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. मात्र, जबाबात घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. अन्य काही सदस्यांचे तसेच या अपहाराशी थेट संबंध असणाऱ्या आणखी काहींचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचेही तपास अधिकारी जयदीप कळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)