शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय विद्यार्थी अडचणीत

By admin | Updated: January 31, 2016 01:18 IST

संकेतस्थळ बंद : २५ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सरकारी तिजोरीतच

रत्नागिरी : सध्या सर्वच शासकीय कामे आॅनलाईन करावी लागत आहे. मात्र, त्यातील सदोषतेमुळे लाभार्थ्यांना त्याचा फटका बसतो, याचा प्रत्यय मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसला आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या समाजकल्याण विभागाची आॅनलाईन शिष्यवृत्ती यंत्रणा सदोष असल्याने जानेवारी संपला तरीही जिल्ह््यातील शाळा, महाविद्यालयांच्या सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती या विभागाच्या तिजोरीतच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी असणारी शिष्यवृत्तीही शासनाकडून बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांना हा खर्च करावा लागणार आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या, सर्व व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या महाविद्यालयातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य तसेच प्रवासखर्च आदी खर्चासाठी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावर शिष्यवृत्ती दिली जाते. तर शैक्षणिक संस्थांना त्या विद्यार्थ्यांच्या फीची रक्कम दिली जाते. या दोन्ही स्कॉलरशीप समाजकल्याण विभागाकडून देण्यात येतात. गेल्यावर्षापासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज आॅनलाईन करावा लागत आहे. मात्र, यासाठी उपलब्ध असणारे समाजकल्याण विभागाचे संकेतस्थळ बंद आहे. या सदोष यंत्रणेमुळे जिल्ह््यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागाच्या तिजोरीत अडकल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार पालकांना पेलवेनासा झाला आहे. तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीही संबंधित शैक्षणिक संस्थेकडे आॅनलाईन जमा होणार आहे. दरवर्षी या दोन्ही शिष्यृवत्ती आॅगस्ट अखेरीला जमा होतात. मात्र, आता जानेवारी संपला तरी या शिष्यवृत्ती जमा झालेल्या नाहीत. ज्या शाळा - महाविद्यालयांना अनुदान मिळते, त्यांच्या शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडून दिले जाते. मात्र, विना अनुदानित शाळा - महाविद्यालये यांना शुल्काच्या रकमेतूनच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार तसेच व्यवस्थापन याचा खर्च पेलावा लागतो. काही शुल्क शैक्षणिक संस्था सुरू झाल्यानंतर लगेचच भरणे क्रमप्राप्त असल्याने संस्था अशा विद्यार्थ्यांचे शुल्क भरतात. त्यामुळे शुल्कापोटी लाखो रूपये या संस्थांना खर्च करावे लागतात. मात्र, अजूनही ही शुल्कापोटीची रक्कम या संस्थांना मिळाली नसल्याने त्यांच्यासमोर शिक्षकांचे, इतर कर्मचाऱ्यांचे पगार तसेच व्यवस्थापनावर होणारा खर्च कसा करावा, हा पेच निर्माण झाला आहे.जोपर्यंत हे संकेतस्थळ सुरू होणार नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची मिळणे कठीण आहे. यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय ३० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)