शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय वस्तीला डावलले

By admin | Updated: July 17, 2016 01:06 IST

मालवण महापालिका आरक्षण सोडत : प्रभाग रचना; नागरिकांची सामूहिक हरकत

मालवण : मालवण पालिकेच्या प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडतीवर बसस्थानकामागील मागासवर्गीय नागरिकांनी सामूहिक हरकत घेतली आहे. अनुसूचित जातीचे टाकण्यात आलेले आरक्षण हे चुकीचे आहे. कायमस्वरूपी वस्ती असलेल्या प्रभाग सातमधील नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. जनगणनेतील सर्व्हे चुकीचा असून, त्यात नवबौद्ध कुटुंबांचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात आलेला नसल्याने याचा फटका आरक्षण सोडतीत बसला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जातीची लोकसंख्या आरक्षणासाठी ग्राह्य धरण्यात आली. त्यामुळे कायमस्वरूपी दलितवस्तीला यात डावलल्याने नागरिकांनी सामूहिक हरकत घेतली आहे.दरम्यान, नगरपालिकेच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत गुरुवारपर्यंत होती. प्रभाग रचनेवर एकही हरकत शहरातील नागरिकांनी घेतली नव्हती. मात्र, आरक्षणातील अनुसूचित जातीचे आरक्षण चुकीच्या प्रभागात टाकले गेले असल्यानेच सामूहिक हरकत घेण्यात आली आहे. या हरकतीवर २७ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी देणार आहेत. सुनावणी अहवाल २ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्त तसेच पालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. हरकतीत म्हटले आहे, प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. मात्र, हा प्रभाग ७ मधील मागासवर्गीय लोकवस्तीवर अन्याय आहे. प्रभाग क्रमांक ७ हा १९९३ पासून अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. असे असताना प्रभाग तीनमध्ये पालिका कर्मचाऱ्यांची कॉलनी आहे, येथे ते कायम वास्तव्यास राहणार नसून ते आपल्या मूळ गावी स्थलांतरित होणार आहेत. असे असताना कायमस्वरूपी लोकवस्तीचा जनगणना सर्वेक्षणात नवबौद्ध म्हणून समावेश करण्यात आला नाही. परिणामी प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जातीची संख्या जास्त धरली जाऊन ती लोकसंख्या आरक्षणासाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सुनावनीकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)प्रभाग सातमध्ये आरक्षण सोडत काढावीअनुसूचित जातीच्या मूळ वस्तीमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. रस्ता सुधारणा, शौचालयांची दुरवस्था, नळपाण्याचा प्रश्न, डासांचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. शहरातील मूळ दलित वस्ती आरक्षणापासून अन्याकारकरीत्या वंचित राहिली आहे. त्यामुळे फेरसर्वेक्षण करून प्रभाग सातमध्ये नवबौद्ध कुटुंबांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करून आरक्षण सोडत काढावी. नगरपालिका हद्दीतील पारंपरिक वस्तीचा विचार करण्यात यावा. प्रभाग ३ करिता आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेले अनुसूचित महिला आरक्षित पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी या हरकतीत करण्यात आलेली आहे.