शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या समोर कार्यकर्त्यांत बाचाबाची

By admin | Updated: June 29, 2015 00:24 IST

सावंतवाडीतील घटना : जुन्या कार्यकर्त्यांनी भेट घेतल्याने दुसरा गट आक्रमक

सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात मनसेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यावेळी जुन्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतल्याने दुसरा गट चांगलाच आक्रमक झाला आणि त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली. यावेळी स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हॉटेलच्या रूममधून बाहेर येत जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे संताप व्यक्त केला. या अचानक घडलेल्या प्रकाराने सर्व कायकर्ते शांत झाले. हा सर्व प्रकार सावंतवाडीतील एका हॉटेलात घडला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारपासून सावंतवाडीत आहेत. त्यांनी रविवारी दुपारी मनसेच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जुन्या-नव्यांशी संवाद साधल्यानंतर जिल्हाध्यक्ष धीरज परब व शैलेश भोगले या दोघांना हॉटेलमधील रूममध्ये बोलावून विचारविनिमय करीत असतानाच जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यात व जुन्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. बाचाबाचीचा आवाज हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चर्चा करीत असलेल्या ठिकाणी ऐकण्यास गेला. त्यामुळे राज ठाकरे रूमच्या बाहेर आले आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला.जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना चांगलेच सुनावले. तसेच चांगले वातावरण बिघडवू नका, अशी समजही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली व तेथे पुन्हा रूममध्ये गेले. या प्रकारानंतर मात्र मनसेतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. मनसेच्या जुन्या गटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुुंबई येथे भेटण्यास बोलावले असून त्यावेळी ते कैफियत ऐकून घेणार आहेत. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचा समावेश असून त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अध्यक्षांना भेटण्यासाठी घेऊन आले होते. (प्रतिनिधी)