शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अप्रतिम ‘स्टॅच्यू’नी डोळ्यांचे पारणे फेडले.

By admin | Updated: October 2, 2014 22:22 IST

जिल्हास्तरीय स्पर्धा : बांदा येथील ‘ग्राम स्वच्छता अभियान’ प्रथम

वेंगुर्ले : एकापेक्षा एक अप्रतिम अशा ‘स्टॅच्यू’नी वेंगुर्लेतील रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येथील मातोश्री कला-क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्टॅच्यू स्पर्धेत स्पर्धकांनी विविध विषयावरील आकर्षक असे स्टॅच्यू सादर केले. बांदा येथील गुरू बांदेकर आणि सहकारी यांनी सादर केलेल्या ‘ग्राम स्वच्छता अभियान’ या स्टॅच्यूने प्रथम क्रमांक मिळविला. दाभोली नाका येथे झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक बांदा येथील भाई म्हाडगूत आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कारगिल विजय’ या स्टॅच्यूला आणि इन्सुली येथील विलास कोरगावकरने सादर केलेल्या ‘गार्डन लॅम्प’ या स्टॅच्यूला विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक बांदा येथील बाबू मेस्त्री आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘कबड्डी ट्रॉफी’ या स्टॅच्यूला देण्यात आला. उत्तेजनार्थ क्रमांक मकरंद वेंगुर्लेकर (महात्मा गांधी), धीरज घाडी (श्री देव वेतोबा आरवली), नित्यानंद वेंगुर्लेकर (धूम्रपान टाळा जीवन वाचवा), भैरवी घाडी (उपरलकर देवस्थान) व प्रतीक्षा आरोलकर (मारुती) यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. पी. जी. देसाई, महेंद्र मातोंडकर व पंकज शिरसाट यांनी केले. सूत्रसंचालन छोटू कुबल यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मातोश्री कला-क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विष्णूदास कुबल, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, श्रीकांत रानडे, जयंत मोंडकर, वसंत तांडेल, प्रकाश धावडे, कांता मुणनकर, सुनील भैरे, सुनील मांजरेकर, दादा सोकटे, शरद मेस्त्री, भूषण आंगलेकर, छोटू कुबल, तुषार साळगावकर व अन्य सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विजेत्यांचे उत्सव समितीचे अध्यक्ष विलास गावडे व उपाध्यक्ष भूषण सारंग यांनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)