शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

असलदे सोसायटीचे प्रकाश परब अध्यक्ष

By admin | Updated: April 1, 2015 00:15 IST

आवाजी मतदानाने निवडणूक : उपाध्यक्षपदी दिनकर दळवी; असलदे सोसायटीची प्रथमच निवडणूक

नांदगांव : असलदे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रकाश परब, तर उपाध्यक्षपदी दिनकर शंकर दळवी यांची आवाजी मतदानाने सोमवारी निवड करण्यात आली. आवाजी की गुप्त मतदान करायचे, यावरून आठ विरुद्ध पाच असे बहुमत मिळाल्याने आवाजी मतदान घेण्यात आले. यामधील १२ उमेदवार हे बिनविरोध, तर एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. कित्येक वर्षानंतर यावर्षी प्रथमच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली.असलदे सोसायटीची गेली अनेक वर्षे निवडणूक बिनविरोध होते. याही वर्षी १३ पैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या तर एका जागेसाठी १५ मार्चला भिसाजी तांबे व अनंत तांबे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये भिसाजी तांबे हे विजयी झाले. त्यानंतर सोमवारी अध्यक्ष निवडीसाठी दुपारी ३ नंतर सुरुवात झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी प्रकाश राजाराम परब विरुद्ध लक्ष्मण गंगाराम लोके, तर उपाध्यक्ष पदासाठी दिनकर शंकर दळवी विरुद्ध सुरेश राजाराम मेस्त्री यांच्यात लढत झाली. त्यामध्ये अध्यक्ष प्रकाश परब व उपाध्यक्ष दिनकर दळवी आठ विरुद्ध पाच अशा मत फरकाने विजयी झाले, तर असलदे विविध कार्यकारी सोसायटी कार्यकारिणी सदस्यपदी लक्ष्मण गंगाराम लोके, सुरेश राजाराम मेस्त्री, परशुराम रत्नू परब, विठ्ठल जानू खरात, कृष्णा जयराम डामरे, भिसाजी बाबी तांबे, सुनीता भगवान नरे, वंदना भास्कर हडकर, भगवान सुरेश लोके, विलास मनोहर जांभळे, बाळा भाऊ खरात यांची निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून फळसणकर यांनी काम पाहिले, तर सचिव मुसळे यांनी सहकार्य केले. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन उपस्थितांकडून करण्यात आले. यावेळी कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे आत्माराम गोसावी व झोरे उपस्थित होते. (वार्ताहर) वाद मिटलासंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर काही काळ दोन गटात शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर किरकोळ धक्काबुक्कीत झाले होते.यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले होते, मात्र काही जाणत्या नेत्यानंी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद अखेर मिटला. यावेळी कासार्डे आऊटपोस्टचे आत्माराम गोसावी व झोरे उपस्थित होते. या वादासंदर्भात कासार्डे दूरक्षेत्रात विलास जांभळे आणि संतोष राजाराम परब यांनी एकमेकांविरोधात नोंद केली होती.