शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

असनिये गाव ‘धनेश’ संवर्धन केंद्र

By admin | Updated: November 6, 2015 23:40 IST

राज्य जैवविविध मंडळाची मान्यता : संवर्धनासाठीच्या उपक्रमाला मिळणार बळ

बांदा : जैवविविधतेने संपन्न असलेल्या असनिये गावात दुर्मीळ ‘धनेशी’ पक्षाच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविध मंडळाने असनिये गावाला ‘धनेश संवर्धन केंद्र’ म्हणून मान्यता दिली आहे. या मंडळाचे वरिष्ठ संशोधक डॉ. राहुल मुंगीकर यांनी नुकतीच गावाला भेट देऊन येथील जैवविविधतेची माहिती घेतली. शासनाने धनेश संवर्धन केंद्र म्हणून मान्यता दिल्याने या पक्षाच्या संवर्धन मोहिमेला बळकटी मिळणार आहे. डॉ. राहुल मुंगीकर यांनी येथील निसर्गसौंदर्याचे कौतुक करीत गावातील दुर्लक्षिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव देण्याचे सुचविले. यावेळी त्यांनी ग्रामीण पर्यटन विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन केले. याबाबत सरपंच सावंत यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी समिती सदस्य एम. डी. कावळे, शरद सावंत, दाजी गावडे, बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर, आत्माराम सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) असनियेत विपुल प्रमाणात वनौषधी सरपंच गजानन सावंत यांनी गावातील पर्यटन स्थळ व धनेश पक्षी संवर्धनाबाबत माहिती दिली. गावात दोन बारमाही वाहणारे धबधबे आहेत. तसेच गावात दीड कि.मी. लांबीची भल्यामोठ्या दगडांनी रचलेली प्राचीन गुहा आहे. त्या गुहेत झऱ्यांच्या पाण्याचा गारवा अनुभवता येतो. गावात नैसर्गिक पाण्याचे ८३ स्रोत आहेत. नारळ, फोफळीच्या बागा, हिरवीगार वनराई व परिसरातील जंगलात विपुल प्रमाणात वनौषधी आहेत. त्यामुळे गावात पर्यटनाला वाव आहे. धनेश केंद्र म्हणून मान्यता मिळणे आवश्यक धनेश पक्षी हा दुर्मीळ प्रजातीत मोडणारा असून, या पक्षाचे अस्तित्व असनिये परिसरात आढळले आहे. या पक्षाच्या संवर्धनासाठी असनिये गावात ग्रामजैवविविधता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून धनेश पक्षांच्या संवर्धनासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवरच असनिये गावाला धनेश केंद्र म्हणून मान्यता मिळाल्याने धनेश पक्षाच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शासनस्तरावरून निधी प्राप्त होणार आहे.