शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अटकसत्र सुरूच; खेडमधून आणखी एक ताब्यात

By admin | Updated: April 27, 2015 00:16 IST

रघुवीर घाटातील हत्याकांड : नातेवाइकांनी मृतांना ओळखले

खेड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मालदेव सेडाशी येथील सावंत कुटुंबीयाच्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नातेवाइकांनी तिघाही मृतांना ओळखले असून, सडलेल्या मृतदेहांचे नमुने तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत.लीलाबाई बापू सावंत (वय ४२), मनीषा बापू सावंत (१७), पूनम बापू सावंत (१२) यांचा खून करून त्यांचे मृतदेह रघुवीर घाटातील माकडकडी भागात टाकून दिल्याप्रकरणी अशोक धोंडिराम ढवळे (रा. शिरगाव पिंपळवाडी, ता़ खेड) आणि अविनाश शिंदे (रा. शिंदी, ता. महाबळेश्वर, जि़ सातारा) यांना पेण पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. खेड तालुक्यातील आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी नातेवाइकांनी तिन्ही मृतदेह ओळखले असून, याप्रकरणी आरोपींची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सडलेल्या मृतदेहांचे नमुनेदेखील तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत.मायलेकींचे सडलेले मृतदेह पेण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्या मृतदेहांचे विच्छेदन तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यावर ते मृतदेह खेड नगरपरिषदेच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत. या हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले आहेत. या तिघीही बेपत्ता झाल्याची तक्रार दीपाली प्रशांत शिंदे (२३, रा. दिवा) यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर तपास करताना हे हत्याकांड उघड झाले. आरोपींनी तिघींना रघुवीर घाटात अज्ञातस्थळी ठेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)सावंत यांचा मोबाईल आरोपीकडेमृत लीलाबाई सावंत हिचा मोबाईल आरोपीकडे सापडल्यामुळेच आरोपीचा शोध लागल्याचा दावा पेण पोलिसांनी केला़ हत्याकांडप्रकरणी आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबतचा तपास पेण पोलीस करीत असतानाच पोलिसांनी खेड तालुक्यातून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.