शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परमानंद हेवाळेकरला अटक; जामिनावर सुटका

By admin | Updated: September 11, 2016 23:17 IST

कमालीची गुप्तता पाळून पोलिसांनी केले न्यायालयात हजर

कुडाळ : तीन वर्षांपूर्वी विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेला महादेवाचे केरवडे येथील फरार आरोपी परमानंद सावळाराम हेवाळेकर याला शनिवारी कुडाळ पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक करीत रात्री उशिरा कुडाळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १५ हजारांच्या जामिनावर त्याची मुक्तता केली. महादेवाचे केरवडे येथील परमानंद हेवाळेकर हा आपल्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एक विवाहित महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास घुसला होता. या प्रकरणी महिलेने कुडाळ पोलिसांत २०१३ मध्ये तक्रार दिली होती. आरोपी परमानंद हेवाळेकर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिस अटक करतील या भीतीने परमानंद हा गेले तीन वर्षे गाव सोडून फरार होता. अलीकडेच कुडाळ न्यायालयाने त्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. तशी नोटीसही त्याच्या घरावर चिकटवण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वीच तो आपल्या पत्नीसह गणेशमूर्ती घेऊन मंत्रालयाच्या समोर गावाने आपणास बहिष्कृत केले असे म्हणत उपोषणास बसला होता. त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे रत्नागिरीचे अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील हे गेले चार दिवस कुडाळ येथे ठाण मांडून असून, या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. दरम्यान, फरार असलेला परमानंद हेवाळेकर हा गेले चार दिवस कुडाळ पोलिसांसोबतच असून, त्याला त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. त्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. याची माहितीही कुणालाच देण्यात आली नाही. एवढ्या रात्री अटक करून न्यायालयात हजर करण्याचे कारण काय, असाच सवाल आता उपस्थित होत असून, पोलिसही या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. न्यायालयाने हेवाळेकर यांची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.(प्रतिनिधी)