शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सभापती बदलाच्या कारवायांना सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 01:07 IST

सेनेचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर : राजापूर पं. स. मध्ये पडद्यामागे रंगले नाट्य

राजापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन सभापती व उपसभापती बदलण्याचा शिवसेनेच्याच काही सदस्यांचा डाव राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी हाणून पाडला आहे. त्यामुळे विद्यमान सभापती व उपसभापती यांना मुदतवाढ मिळाली आहे.गेले काही दिवस राजापूर पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती बदलांबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या. राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण बारा सदस्यांपैकी सहा सदस्य शिवसेनेचे, चार काँग्रेसचे व दोन राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीने साथ दिल्यामुळे शिवसेनेने सभापती पदावर बाजी मारली. त्यात राष्ट्रवादीने उपसभापतिपद आपल्या पदरात पाडून घेतले. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बिनसल्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा काँग्रेसचा हात धरला होता. त्यानंतर झालेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीदरम्यान समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठीचा वापर केला गेला व त्यामध्ये नशिबाची साथ मिळाल्याने दोन्ही पदे सेनेकडे गेली.गेल्या काही दिवसांत शिवसेनेतील काही मंडळींना सभापती व उपसभापती बदलाचे डोहाळे लागले. त्यांनी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीची गरज पडणार होती. त्यासाठी सेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांना पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. राष्ट्रवादीच्या त्या दोन्ही सदस्यांना घेऊन या, त्यानंतर विद्यमान सभापती व उपसभापतींचे राजीनामे घेतो असा सल्ला सेनेच्या वरिष्ठांनी दिला. राष्ट्रवादीचे सदस्य कुठल्याही क्षणी सेनेच्या ताब्यात जातील, याची कुणकुण लागल्याने राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव, तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यांनी प्रखर विरोध दर्शविलाच, शिवाय आपले सदस्य त्यांच्याकडे जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. राष्ट्रवादीच्या या जोरदार व्यूहरचनेमुळे सभापती व उपसभापती बदलाबाबतचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान सभापती सोनम बावकर व उपसभापती उमेश पराडकर यांना आपोआपच मुदतवाढ मिळाली आहे. आता पुढीलवर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपर्यंत हे दोन्ही पदाधिकारीच कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकरणातून शिवसेनेचा अंतर्गत संघर्ष मात्र चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)