शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकरा इच्छुकांच्या समर्थकांत वाद

By admin | Updated: January 13, 2016 23:13 IST

पक्षनिरीक्षकांची उडाली भंबेरी : वेंगुर्ले भाजपाध्यक्ष निवडीचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात

वेंगुर्ले : भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्षपदाच्या निवडीत दोन विचारसरणीचे गट निर्माण होऊन तब्बल अकराजण अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. तर समर्थकांनी वादंग निर्माण केल्यामुळे पक्षनिरीक्षकांची भंबेरी उडाली आणि शेवटी अध्यक्षपदाचा निवडीचा चेंडू पक्षनिरीक्षकांनी वरिष्ठांच्या कोर्टात ढकलला आहे. वेंगुर्ले भाजप मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. मागील भाजप तालुकाध्यक्षपदासाठी कुणीच इच्छुक नसलेल्या निवडणुकीत राज्यात व केंद्रात सत्ता आल्याने साहजिकच पक्ष प्रभाव वाढल्याचा प्रत्यक्ष अनुभव आजच्या निवडीत आला. वेंगुर्ले भाजप अध्यक्ष पदाच्या निवडीत प्रसन्ना देसाई, रवींद्र शिरसाट, बाळा राऊत, प्रशांत प्रभूखानोलकर, संजय गावडे, संदीप पाटील, शैलेश जामदार, दत्ताराम माळकर, विनायक गवंडळकर, सदाशिव लेले, हितेश धुरी या सद्य:स्थितीतील भाजपच्या दोन विचारसरणीतील उमेदवारांनी उमेदवारी दर्शविली. पक्षनिरीक्षक म्हणून सावंतवाडी तालुका भाजप अध्यक्ष मनोज नाईक, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, मिलिंद केळुसकर व भाजप तालुका निवडणूक निर्णय अधिकारी साईप्रसाद नाईक यांनी अकराहीजणांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, अध्यक्ष निवडीत एकमत होऊ शकले नाही. निवडी दरम्यान समर्थकांसह उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने मोठे वादंग निर्माण झाले. काहीतरी विपरीत होण्याची चिन्हे असतानाच पक्षनिरीक्षकांच्या वेळीच हस्तक्षेपाने हे प्रकरण शमले. अध्यक्षपद निवडीत अखेरपर्यंत एकमत न झाले नाही. शेवटी पक्षनिरीक्षकांनी हात टेकून अध्यक्ष निवडीची परिस्थिती जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीला कळविली असून अध्यक्ष निवड वरिष्ठांकडूनच आठवडाभरात होणार आहे. यावेळी गावनिहाय ९३ पैकी ८५ बुथप्रमुख व स्थानिक समिती अध्यक्ष, सावंतवाडीचे शहराध्यक्ष अनंत नेवगी तसेच तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)