शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कर्ली वसिष्ठी नदीवर साकव मंजूर

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

‘लोकमत’चा पाठपुरावा : दुकानवाड ग्रामस्थांत समाधान

शिवापूर : पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसाठी आधारवड बनणारे माणगाव खोऱ्यातील कर्ली व वसिष्ठी नदीवरील लोखंडी साकव मंजूर झाल्याने दुकानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थ व प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या साकवाबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता.माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पंचक्रोशीमध्ये शिवापूर, वसोली, उपवडे, आंजिवडे व हळदीचे नेरूर ही गावे येतात. या गावातून शिवापूर या ठिकाणी उगमस्थान असलेली व शेवटी कर्ली येथे समुद्राला जाऊन मिळणारी कर्ली नदी तसेच वसिष्ठी या दोन नद्या वाहतात. वसिष्ठी ही दुकानवाड बाजारपेठेनजीक येऊन कर्ली नदीला येऊन मिळते. वसोली, उपवडे, हळदीचे नेरूर ही गावे महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येतात. सन १९८१ ला या धरणाची अधिसूचना निघाल्यानंतर या गावातील सर्व विकासात्मक कामे ठप्प झाली. त्यामुळे या भागातील रस्ते मातीचेच होते.या भागात पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्याने तसेच हा भाग बुडीत क्षेत्रात येत असल्याने नद्यांवर पक्के पूल नव्हते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या भागातील लोकांना सावंतवाडी, कुडाळ, माणगाव या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात पर्याय म्हणून शासनाच्यावतीने दुकानवाड, वसोली कुत्रेकोंड, सतयेवाडी नजीक व शिवापूर कोठीवाडी या ठिकाणी लोखंडी साकव टाकण्यात आले होते. पावसाळ्यात कर्ली नदी जेव्हा दुथडी भरून वाहते, तेव्हा हे लोखंडी साकवच लोकांचा आधारवड बनतात.साधारण १९९८-९९ च्या दरम्यान या भागाला योग्य नेतृत्व मिळाल्याने धरणापासून अडलेल्या विकासाबाबत विचारमंथन करून सन १९८१ पासून १९९८ पर्यंत धरण न झाल्याने येथील विकास खुंटलेल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच रस्ते, पूल, साकवांच्या मंजुरीबाबत पाठपुरावा केला. गेली कित्येक वर्षे योग्य डागडुजी नसल्याने या भागातील सर्व साकव जीर्ण झालेले असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.याबाबत ‘लोकमत’ने वारंवार सचित्र माहिती प्रसिद्ध करून ग्रामस्थांच्या या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती व हळदीचे नेरूर पंचायत समितीचे सदस्य यांनी या साकवांसाठी विशेष प्रयत्न करून पुळास, दुकानवाड बाजार, मोरे, चौकलेबाग, वसोली कुत्रेकोंड, सतयेवाडी तसेच कोठीवाडा येथील लोखंडी साकव मंजूर करून घेतल्याने दुकानवाड पंचक्रोशीतून समाधान व्यक्त होत आहे. यासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रतिभा म्हाडगूत यांनीही प्रयत्न केले होते. (वार्ताहर)