शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मूळ अंदाजपत्रकालाच मंजुरी

By admin | Updated: January 13, 2016 21:49 IST

ठराविक केले बदल : वेंगुर्ले पंचायत समिती सभा

वेंगुर्ले : मूळ अंदाजपत्रकात काही आमुलाग्र बदल सुचवून त्यास मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली. सभा सभापती सुचिता वजराटकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती स्वप्नील चमणकर, पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, सुनील मोरजकर, पुरूषोत्तम परब, अभिषेक चमणकर, सावरी गावडे, चित्रा कनयाळकर, उमा मठकर, प्रणाली बंगे, गटविकास अधिकारी माधुरी परीट, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट व विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेची सुरूवात जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच वेंगुर्लेचे सुपुत्र महाकवी मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतून जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या सर्व खेळाडूंच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. मागील सभेत शेतकऱ्यांना कृषी विभागांतर्गत प्लास्टिक टप वाटप करण्याचे ठरविले होते. पण कृषी विभागाच्या निधीतून प्लास्टिक टप वाटप करता येणार नसल्याने कृषी विभागाचे मार्गदर्शन न घेता संकीर्ण या हेडखाली हे प्लास्टिक टप वाटप करण्याचे ठरले. यासाठी ९० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ताडपत्री वाटपासाठी ३ लाख, तर बायोगॅससाठी १ लाख ८० हजारची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अनुदानित जे साहित्य दिले जाते, ते दुय्यम दर्जाचे दिले जाते. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी सूचना अभिषेक चमणकर यांनी केली. यावेळी ६४ हजार शिलाई अधिक बिडींग मशीन व २० हजार रूपये सायकलसाठी असा निधी मंजूर करण्यात आली. तसेच इमारत दळणवळणासाठी तीन लाखाची तरतूद करण्यात आली. कामांसाठी नेमलेले कंत्राटदार ती कामे पूर्ण करण्यासाठी कमी पडतो. त्यामुळे अडथळे येतात, अशी कामे पूर्ण होईपर्यंत त्याकडे लक्ष देण्याची सूचना सभापती सुचिता चमणकर यांनी केली. (प्रतिनिधी) कुपोषित मुलांची संख्या वाढली वेंगुर्ले तालुक्यात कुपोषित व कमी वजनाच्या मुलांची संख्या ६१ वर गेली असून, ती नियंत्रित राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, असा प्रश्न अभिषेक चमणकर यांनी उपस्थित केला. यावेळी प्रत्येक गावात मातांच्या बैठका घेऊन पालकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करून संख्या कमी होण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यावेळी म्हणाले.