शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

तहसीलदारांवर आणखी एक गुन्हा

By admin | Updated: September 28, 2015 23:46 IST

गुरुनाथ हुन्नरे : नोंदीत फेरफार केल्याचा आरोप

राजापूर : शासकीय अधिकाराचा गैरवापर करत वारस नोंदीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी ओणी सजाचे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच राजापूर तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच लाच प्र्रकरणात अडकलेल्या तहसीलदार हुन्नरे यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे.ओणी येथील रामचंद्र हरीश्चंद्र गोरूले व मानू तानू गोरूले यांची सामाईक मिळकत असून, या मिळकतीपैकी सामाईक घर क्र. २६८व जमीन गट क्र.४४४।४४९। ४।२५।४५४।४१०।३२८।१९५।११९अ।९ब।४७९।४०४ या मिळकतींच्या वारस नोंद फेरफारमध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचे रामचंद्र गोरूले यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दि. १२ डिसेंबर २०१३ रोजी फिर्याद दाखल करून मानू गोरूले यांच्यासह ओणी तलाठी एस. एस. गांधी, मंडल अधिकारी सुरेश गांधी व तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.आपल्या शासकीय अधिकाराचा गैरवापर करत फिर्यादी रामचंद्र गोरूले यांची फसवणूक केल्याप्रकरणी राजापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्यासह मानू गोरूले यांच्याविरोधात क्रीमीनल प्रोव्हीसर कोड कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश राजापूर पोलिसांना दिले आहे. त्यानुसार राजापूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांना नुकतेच दोन लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.राजापुरातील महसूल प्रशासनाचे अनेक कारनामे आता हळूहळू बाहेर येत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वस्तुनिष्ठ व निर्भिडपणे सत्य बाजू मांडली होती. तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांना लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्यांच्याविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. राजापुरातील भोळ्या भाबड्या जनतेच्या अज्ञानीपणाचा गैरफायदा घेऊन प्रशासनाकडून त्यांना लुबाडण्याचे काम गेले अनेक दिवस सुरु आहे. (प्रतिनिधी)ओणीतील ग्रामस्थांच्या सामाईक मिळकतीत केला घोळ.मिळकतीची वारस नोंद फेरफारमध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचे निष्पन्न.राजापूर महसूल प्रशासनाचे एकेक कारनामे उघड.लोकमतने केला होता वारंवार पाठपुरावा.