शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १४ रुग्णांची भर

By admin | Updated: March 19, 2015 00:02 IST

बोरज अतिसार : आरोग्य विभागाची तीन पथके तैनात

खेड : तालुक्यातील बोरज गावातील ग्रामस्थांना दुषित पाण्यामुळे उलटी जुलाबाचा त्रास झाल्याने कळंबणी रूग्णालयात उपचार घेत असलेले आणि उपचार घेऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या ६३वर पोहोचली आहे. याबाबतची कळंबणी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत यांनी दिली आहे. यामध्ये लोटे येथील रूग्णालयामध्ये दाखल केलेल्या दोन रूग्णांचा समावेश आहे़ मंगळवारी ४० रूग्णांपैकी ६ जणांना घरी पाठवण्यात आले होते.़ सांयकाळी पुन्हा १० जणांना दाखल करण्यात आले होते़ यामुळे रूग्णालयात ४४ रूग्ण उपचार घेत होते. बुधवारी मात्र कळंबणी रूग्णलयातील ११ जणांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना सकाळी बोरज येथील त्यांच्या घरी पाठवण्यात आले, तर बोरज गावातील आणखी १४ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यातील ८ जणांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर ६ जणांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कळंबणी रूग्णालयात बुधवारी दाखल असलेल्या रूग्णांची संख्या ४१ झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ विनोद अभिवंत यांनी दिली आहे बोरज गावातील या तीन वाड्यामध्ये २३६ घरे आहेत. या सर्वच घरांमध्ये अतिसाराची लागण झाली आहे़ येथे ३ रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. रूग्णवाहिकेच्या या तातडीच्या सेवेमुळे रूग्णांना सत्वर आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने ही साथ ओटाक्यात आणणे शक्य झाले आहे.याशिवाय प्रत्येकाच्या घरामध्ये १०० मिली मेडिक्लोअर बाटली देण्यात आली आहे. याद्वारे घरातील पाणीदेखील शुध्द करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात ३ पथकाद्वारे तेथील रूग्णांना तातडीने सेवा देण्यात येत असून तालुका आरोग्य अधिकारी आणि दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आणखी २४ कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. सर्वांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. विनोद अभिवंत यांनी दिली आहे. दरम्यान गावातील अतिसाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यशही येत असले, तरी नव्याने रूग्ण रूग्णालयात दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशाराअतिसार प्रकरणी कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची हेळसांड झाल्याबाबत खेड तालुका आरपीआय युवक आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आरोग्य केंद्राला आरपीआय युवक आघाडीने भेट दिली असता, तेथील असुविधांबाबत आघाडीने चिंता व्यक्त केली. आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव होता. पीडितांची काळजी न घेतल्यास आरपीआय आंदेलन छेडेल, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़