शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर

By admin | Updated: January 29, 2016 23:54 IST

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली : ओरोस, अणाव, रानबांबुळी या तीन गावांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी-ओरोस नगरपंचायत स्थापनेची प्रारुप अधिसूचना अखेर शासनाने जाहीर केली आहे. ओरोस, अणाव व रानबांबुळी या तीन गावांची मिळून सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन होणार असल्याने सिंधुदुर्गनगरीच्या विकासाचा मार्ग अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोकळा झाला आहे. नगरपंचायत स्थापनेच्या अधिसूचनेची माहिती ओरोस सरपंच मंगला ओरोसकर व जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओरोस, अणाव व रानबांबुळी या तीन गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाची निर्मिती केली व त्याठिकाणी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्वात आले. परंतु, गेल्या २५ वर्षांत या नगरीचा अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. प्राधिकरणकडे स्वतंत्र निधी किंवा स्वतंत्र कर्मचारीवर्ग नाही. त्यामुळे सिंधुदुर्गनगरीचा विकास होण्यासाठी नगरपंचायत स्थापनेची मागणी सिंधुदुर्गनगरीवासीयांकडून होऊ लागली. नगरपंचायतीच्या मागणीचा प्रस्ताव २८ जून २००७ रोजी शासनाला पाठविण्यात आला होता. पहिला प्रस्ताव गहाळ नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरलेओरोस-सिंधुदुर्गनगरीच्या नावाने आता मुख्यालय, ओरोस, अणाव व रानबांबुळी या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करणारी प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे ग्रामस्थांचे नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.हे मुख्यालयाचे ठिकाण असल्याने या नगरपंचायतीला फार महत्त्व आहे. यामुळे नगरपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासूनच तयारी केली आहे. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे. नगरपंचायतीबाबत हरकती; २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतया नगरपंचायत स्थापनेबाबत कोणाला हरकती द्यावयाच्या असतील तर २५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवायच्या आहेत. हरकती नसल्यास ओरोस, अणाव व रानबांबुळी या तिन्ही ग्रामपंचायतींसह सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण बरखास्त होऊन सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापन होणार आहे.