शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर

By admin | Updated: April 22, 2015 00:25 IST

वेळा बदलल्या : १० जूनपासून होणार अंमलबजावणी

रत्नागिरी : पावसाळा लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रतिवर्षाप्रमाणे पावसाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. याची अंमलबजावणी १० जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन गाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे रेल्वेला पावसाळी वेगळे वेळापत्रक जाहीर करावे लागते. यंदाही कोकण रेल्वेने हे वेळापत्रक जाहीर केले असून, १० जूनपासून ते अमलात येणार आहे. ज्या प्रवाशांनी पावसाळ्याच्या काळासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण केले आहे, त्यांनी आरक्षण तिकिटावरील रेल्वेची सुटण्याची वेळ आताच तपासून पाहावी, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.सुधारित वेळापत्रकानुसार ११००४ सावंतवाडी - दादर राज्यराणी एक्स्प्रेस सध्या सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटते ती पावसाळ्यात ५ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. १२६१७ एर्नाकुलम - निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस ही एर्नाकुलम येथून दुपारी १ वाजून ५ मिनिटानी सुटते ती सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. १२०५२ मडगाव - दादर जनशताब्दी एक्स्प्रेस ही मडगाव येथून दुपारी २.३० वाजता सुटते ती आता १२ वाजता सुटेल. १२६२० मेंगलोर - लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही दुपारी २.४० वाजता सुटते ती आता दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल.१०११२ मडगाव - छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ही मडगाव येथून सायंकाळी ६ वाजता सुटते ती आता सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल. २२९०७ मडगाव - हाप्पा एक्स्प्रेस ही मडगाव येथून सकाळी १०.४० वाजता सुटते ती सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. १२७४१ वास्को - पाटणा एक्स्प्रेस ही वास्को येथून सायंकाळी ७.४५ वाजता सुटते, त्याऐवजी ती सायंकाळी ६ वाजता सुटेल. १०२१५ मडगाव - एर्नाकुलम एक्स्प्रेस ही रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुटते ती आता ९ वाजता सुटेल. १२४४९ मडगाव - चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस ही सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी सुटते ती आता दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी सुटेल.१२१३४ मेंगलोर - छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्स्प्रेस ही मेंगलोर येथून दुपारी २ वाजता सुटते ती आता सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. १६५२४ कारवार यशवंतपूर एक्स्प्रेस दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी कारवार येथून सुटते ती आता २ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार आहे.५०१०१ रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर गाडी मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांनी रत्नागिरीतून सुटते ती आता मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ५०१०६ सावंतवाडी - दिवा पॅसेंजर गाडी ही सावंतवाडी येथून सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सुटते ती आता ८ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार आहे. ५६६४१ मडगाव - मेंगलोर पॅसेंजर ही मडगाव येथून दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सुटते ती आता दुपारी २ वाजता सुटणार आहे. ५०१०२ मडगाव - रत्नागिरी पॅसेंजर गाडी रात्री ७.४० वाटते मडगाव येथून सुटते ती १० जूनपासून रात्री ८ वाजता सुटणार आहे. (प्रतिनिधी)कोकण रेल्वेने यावर्षी आपले वेळापत्रक दीड महिने अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आतापर्यंत पावसाळ्याच्या काळात आरक्षण केले आहे, त्यांना त्यांच्या बदलत्या रेल्वे वेळापत्रकाबाबत माहिती घ्यावी लागणार आहे.