शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचे ५ आॅक्टोबरला ‘जेल भरो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : सेवाज्येष्ठता व पुरेशी मानधनवाढ मिळेपर्यंत अंगणवाडी सेविका कर्मचारी संप मागे घेणार नाहीत, शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. मागण्या मान्य न झाल्यास ५ आॅक्टोबरला राज्यात जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कमलताई परुळेकर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : सेवाज्येष्ठता व पुरेशी मानधनवाढ मिळेपर्यंत अंगणवाडी सेविका कर्मचारी संप मागे घेणार नाहीत, शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. मागण्या मान्य न झाल्यास ५ आॅक्टोबरला राज्यात जेल भरो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून कमलताई परुळेकर म्हणाल्या की, संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी सेवाज्येष्ठता व पुरेशी मानधनवाढ मिळेपर्यंत संप सुरू केला आहे. या संपाला सत्तेतील शिवसेनेने, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पाठिंबा दिला आहे. असे असताना हा संप फोडण्यासाठी सरकारने नेमलेले पगारी नोकर खोटेनाटे सांगत सेवासमाप्तीच्या नोटिसा राज्यातील विविध प्रकल्पांत देत फिरत असून, कोणीही या त्यांच्या प्रयत्नांना भीक घालू नका. पाठविलेल्या सर्व नोटिसांची होळी करायची आहे, असे आवाहन परुळेकर यांनी अंगणवाडी सेविकांना केले आहे.सीईओंचा खोटा अहवालमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्गात अंगणवाड्या सुरू असल्याचा खोटा अहवाल प्रकल्प अधिकाºयांना पाठवून अंगणवाडी कर्मचाºयांची बदनामी केली. तसेच पाठविलेल्या नोटिशीमध्ये गैरवर्तन हा शब्द वापरणे हे चुकीचे केले असून, त्यांनी कटुता निर्माण करू नये, असा सल्ला परुळेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना दिला.संपाला गालबोट नकोप्रशासनाने कितीही नोटिसा दिल्या तरी कोणीही संपाला गालबोट लावू नका, कारण आपला एकोपाच शासनाला धडा शिकविणार आहे, असेही परुळेकर यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाºयांना पाठविलेल्या नोटिसांची लवकरच होळी करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी ५ आॅक्टोबरला ओरोस येथे जेल भरो आंदोलन करणार असल्याचा इशारा परुळेकर यांनी सरकारला दिला.