शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

५0 लाखांच्या रकमेचा तिढा सुटला

By admin | Updated: October 9, 2016 23:33 IST

रकमेबाबत संशय नसल्याचे आयकरचे पत्र : न्यायालयाच्या परवानगीनंतर पोलिस पैसे देणार

सावंतवाडी : आरोंदा दूरक्षेत्रावर सापडलेल्या ५० लाखांच्या रोकड प्रकरणाचा तपास आयकर विभागाने पूर्ण केला असून, या पैशामागे कोणताही संशय नसल्याचे त्यांनी पोलिसांना कळविले आहे. तसेच पुढील निर्णय आपल्या स्तरावर घ्या, असेही आयकर विभागाने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलिसांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता ५० लाखांच्या रकमेचा गुंता सुटला असून, संबंधितांना हे पैसे न्यायालयीन प्रकियेतून घ्यावे लागणार आहेत. ७ जुलैला रात्रीच्या सुमारास आरोंदा दूरक्षेत्रावर वाहनांची तपासणी करीत असताना पोलिसांना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमध्ये ५० लाखांची रोकड सापडली होती. या रकमेसोबत दोघे युवक होते. त्यांनी हे पैसे व्यवसायातील असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तरीही पोलिसांनी सखोल चौकशी करण्यासाठी युवकांसह पैसे ताब्यात घेतले होते. या रकमेबाबत तत्कालीन पोलिस उपअधीक्षक प्रविण चिंचाळकर व पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी चौकशी केली. मात्र, त्या दोन युवकांच्या उत्तरामध्ये त्यांना संशय आला. तसेच पैशांसोबत रितसर कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी रक्कम सील केली होती. मात्र त्या युवकांना सोडून दिले होते. त्यानंतर हा तपास कोल्हापूर व पुणे येथील आयकर विभागाकडे देण्यात आला. त्यांनी चार ते पाच वेळा या युवकांची चौकशी केली. तसेच त्यांना रितसर कागदपत्रे हजर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. ही चौकशी पुणे येथील कार्यालयात करण्यात आली होती. सतत चार महिने आयकर विभागाने या रकमेबाबत चौकशी केल्यानंतर अखेर चार दिवसांपूर्वी सावंतवाडी पोलिसांना रितसर पत्र पाठवून या पैशांमागे कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या पोलिस ठाण्याच्या स्तरावर कोणती कारवाई करायची असेल तर करू शकता, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पैसे सील केल्याने हे पैसे न्यायालयील मार्गानेच संबधितांना घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी सावंतवाडी न्यायालयाला रितसर बॉण्ड द्यावा लागणार आहे. त्यानंतर पोलिस हे पैसे त्या युवकांच्या ताब्यात देणार आहेत. (प्रतिनिधी) पाटील : न्यायालयीन प्रक्रियेतूनच रक्कम घ्यावी लागेल ४आयकर विभागाने पैशांमागे कोणताही संशय नसल्याचे पत्र पोलिस ठाण्याला पाठविले आहे. मात्र, ही रक्कम सील करण्यात आल्याने न्यायालयीन मार्गानेच हे पैसे घ्यावे लागतील, असे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.