शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अमितच्या घातपाताचा संशय

By admin | Updated: May 7, 2016 00:41 IST

चौकशीने ओटवणे पंचक्रोशीत खळबळ : पत्नीने दिली पंधरा संशयितांची नावे

ओटवणे : ओटवणे नदीपात्रात २३ एप्रिल रोजी बुडून मृत्यू पावलेल्या ओटवणे-गावठणवाडी येथील नारायण उर्फ अमित गावकर यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागत आहे. अमितची पत्नी आर्या गावकर यांनी पंधरा संशयित आरोपींची नावे पोलिसांना दिली असून, पोलिसांमार्फत त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे पंधरा संशयित अमितचेच सहयोगी मित्र असून, चौकशीमुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.२२ एप्रिल रोजी दुपारी कामावरून अचानक परतलेला अमित सायंकाळी गायब झाला होता. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह ओटवणे नदीतील मोठ्या पूलानजीक तरंगताना दिसला. अमित गावकर हा पोहण्यात कुशल होता. त्यामुळे अमितचा पाण्यात बुडून मृत्यू होण्यामागे नक्कीच घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी सुरूवातीपासून व्यक्त केला होता. शिवाय त्याच्या मृत्यूमागची अनेक कारणेही अस्पष्ट असल्याने हे प्रकरण पंचक्रोशीत चांगलेच चर्चिले गेले. जर अमितला आत्महत्या करायची होती, तर त्याने कपडे का उतरवून ठेवले? एवढी मोठी नदी असताना दररोजची मासेमारीचीच जागा आत्महत्येसाठी का निवडली? अमित कामावरून आत्महत्या करण्यासाठीच आला होता की आणखी काही? ज्या दिवशी मृतदेह आढळला, त्या दिवशी त्याने उतरवून ठेवलेले कपडे सापडत नाहीत व अचानक दोन दिवसांनंतर कपडे कसे सापडतात? त्याचा बुडून मृत्यु झाला तर त्याच्या शरीरावर असलेल्या खुणा नेमक्या कशाच्या? तसेच शवविच्छेदन तपासात त्याचा मृत्यू जरी बुडून झाला असला, तरी त्याच्या मानेवर, दातांवर झालेल्या आघाताविषयी कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे. या संशयातूनच अमितच्या कुटूंबियांकडून त्याचा घातपात केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तर अमितची पत्नी आर्या गावकर हिने अमितच्या मृत्युप्रकरणी अमितच्या १५ मित्रांची संशयित म्हणून नावे दिली आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून, पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. (प्रतिनिधी) तो विजय कोण ?: पोलिसांना करावा लागणार तपास अमितचा मृत्यू झाल्यानंतर आठवडाभरानंतर ‘विजय’ नामक व्यक्तीचा अमितची पत्नी आर्या हिला फ ोन आला होता व आपल्याशी फेंडशिप करशील का, अशी त्याने विचारणा केली होती. हा फोन मुंबई नालासोपारा ते विरार या दरम्यानचा असल्याने ही विजय नामक व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित होतआहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. अमितबरोबर शुक्रवारी सायंकाळी दिसलेली ती अनोळखी व्यक्ती ‘विजय’ नसेल ना, याबाबतही आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे.