शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत धबधब्याची कामे निकृष्ट

By admin | Updated: June 27, 2016 00:34 IST

अपघात झाल्यास वनविभागावर गुन्हे दाखल करा

आंबोली : आंबोली धबधब्याच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना वनविभागाला जबाबदार धरावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याजवळ पायऱ्यांचे काम करताना उंची जास्त ठेवली आहे. डाव्या बाजूने रेलींग बसविले नाही. यामुळे पर्यटकांना अपघाताची शक्यता आहे. काही पर्यटक धबधब्याच्या वर चढून अपघात होतो. मात्र, त्यासाठी सुरक्षा उपाययोजना म्हणून जाळी बसविण्याचे काम वनखात्याचे होते. धबधब्याची जमीन वन अखत्यारीत येत असल्याने निधी खर्च करून कामे करण्यासाठी पर्यटनाचा निधी मिळवून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.पर्यटकांची पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही केलेली नाहीत. त्यामुुळे पायऱ्यांची घसरण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनशे झाडे धोकादायक आहेत, असा अहवाल देऊनही अद्याप तोडलेली नाहीत. मात्र, घाटात झाड पडल्यास एकही कर्मचारी तेथे येत नाही. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. घाटात दररोज दरड पडते. त्यावेळी वनखात्याकडे कर्मचारी असूनही दरड हटविण्यासाठी येत नाहीत. मग या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची व वनक्षेत्रपालांची, वनपालांची जबाबदारी काय? आतापर्यंत वनविभागाकडून घाटातील दरडीचा व धोकादायक ठिकाणांचा एकही अहवाल केंद्रीय वनखात्याकडे व पर्यावरण विभागाकडे गेलेला नाही. दरडींना केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरले जाते. मात्र, खरे जबाबदार वनविभाग आहे. त्यामुळे अपघाताची जबाबदारी निश्चित करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पत्रकार अनिल चव्हाण, विजय राऊत, निर्णय राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. यावेळी हवालदार गजेंद्र भिसे, प्रकाश कदम, नितीन उम्रजकर, विलास नर, राजेंद्र शेळके, सर्फराज मुजावर, गुरूदास तेली, गजानन देसाई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)