शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

‘ओंकार’च्या संचालकांनाही अटक करा

By admin | Updated: March 16, 2017 23:23 IST

अडीच कोटींचा घोटाळा : न्यायालयाचे देवरुख पोलिसांना आदेश

देवरुख : शहरातील ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील २ कोटी ५० लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी या पतसंस्थेच्या संचालकांना अटक करण्याचे आदेश देवरुखचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. एन. सरडे यांनी गुरुवारी पोलिसांना दिले.शहरातील प्रथितयश व सातत्याने आॅडिट ‘अ’मध्ये असणाऱ्या ओंकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत सुमारे दोन वर्षांपूर्वी २ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन घोटाळा झाल्याची माहितीदेखील दिली होती. याचदरम्यान घोटाळ्याची नेमकी खोली स्पष्ट होण्याकरिता शासकीय लेखापरीक्षणाची मागणीदेखील जिल्हा निबंधकांकडे करण्यात आली होती. लेखापरीक्षण पूर्ण होताच संचालक मंडळाने या अपहारप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली होती. संचालक मंडळाने आपले म्हणणे देवरुख न्यायालयासमोर सादर करून तत्कालीन व्यवस्थापिका वासंती निकम हिच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. या मागणीप्रमाणे देवरुख न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदेश मिळताच देवरुख पोलिस ठाण्यात निकम हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अधिक तपास करून काही कालावधीनंतर निकमला अटक केली होती. निकम हिची उलटतपासणी व जाबजबाब तसेच महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केल्यानंतर तपासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. हा अपहार कसा झाला, अपहारामध्ये क ोण कोण सामील होते? याची देखील माहिती निकम हिने पोलिसांना दिल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. त्यामुळे काही संचालकांचा अपहाराला छुपा पाठिंबा असल्याचा संशय आहे. त्यामुळे देवरुख पोलिसांनी संचालकांना अटक करण्याची परवानगी देवरुख न्यायालयाकडे मागितली होती.देवरुखचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. एन. सरडे यांनी गुरुवारी ती मान्य करून संचालकांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता संचालकांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)