शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

वैभववाडीत युतीची मुसंडी

By admin | Updated: February 23, 2017 23:54 IST

पंचायत समितीत त्रिशंकू स्थिती : भाजप-शिवसेनेचा विजयी जल्लोष; काँग्रेसची पिछेहाट

वैभववाडी : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला. निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीने जोरदार मुसंडी मारली तर काँग्रेसची प्रचंड पिछेहाट झाली आहे. जिल्हा परिषदेची भाजप, शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली असून पंचायत समितीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या सहापैकी काँग्रेस ३, भाजप २ व शिवसेनेने एका जागेवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत ९ जागा जिंकलेल्या काँग्रेसला यावेळी केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर भाजप शिवसेनेने युतीची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.तहसील कार्यालयात सकाळी १०.३० वाजता टपाली मतांनी मतमोजणीची सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दीपा भोसले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ९ मतदारसंघाची मोजणी एकाचवेळी सुरु केली. एकेका मतदारसंघाची मोजणी पूर्ण होईपर्यंत कसलाच अंदाज बाहेर पडत नव्हता. त्यामुळे पक्ष कार्यालये, पत्रकार व निकालासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची घालमेल सुरू होती. एकेका पंचायत समितीचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढत होती.काँग्रेसने जिल्हा परिषदेचा कोळपेतील गड शाबूत ठेवला. या मतदारसंघात काँग्रेसच्या शारदा कांबळे यांनी भाजपच्या सुस्मिता कांबळे यांना १२११ मतांनी पराभूत केले. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या कोळपेतून हर्षदा हरयाण व भुईबावड्यातून दुर्वा खानविलकर विजयी झाल्या. मात्र, नासीर काझींच्या कोळपे पंचायत समितीत भाजपच्या सीमा नानिवडेकर केवळ १२६ मतांनी मागे पडल्या. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांच्या भुईबावड्यातून दुर्वा खानविलकर यांनी ५४४ मताधिक्य घेतले.भाजपने कोकिसरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा जिंकून काँग्रेसला छोबीपछाड दिला. भाजपचे सुधीर नकाशे यांनी काँग्रेसचे उपसभापती बंड्या मांजरेकर यांच्यावर ८५१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उंबर्डे मेहबूबनगर वगळता संपूर्ण कोकिसरे मतदार संघात काँग्रेसच्या बंड्या मांजरेकरांपेक्षा भाजपचे नकाशे वरचढ राहिले. उंबर्डे पंचायत समिती मतदारसंघात एकट्या मेहबूबनगरच्या जोरावर काँग्रेसचे अरविंद रावराणे यांनी शिवसेनेचे अरुण कदम यांच्यावर अवघ्या ९३ मतांनी निसटता विजयी मिळवला. तर कोकिसरे पंचायत समितीत भाजपच्या अक्षता डाफळे यांनी काँग्रेसच्या पूजा पांचाळ यांचा ७१० मतांनी दणदणीत पराभव केला.लोरे मतदारसंघात शिवसेना, भाजपने सामूहिक लढत देऊन बांधकाम सभापती दिलीप रावराणेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. शिवसेनेच्या पल्लवी झिमाळ यांनी काँग्रेसच्या दीपाली मेस्त्री यांचा ११६ मतांनी पराभव केला. शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी काँग्रेसचे शंकर बर्गे यांच्यावर २६४ मतांनी मात केली. मूळ काँग्रेसचे अपक्ष लढलेले अ‍ॅड. अजितसिंह काळे यांना डावलल्याची किंमत या मतदारसंघात काँग्रेसला मोजावी लागली. लोरे पंचायत समितीत भाजपचे लक्ष्मण उर्फ राजू रावराणे यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार रावराणे यांच्यावर ७० मतांनी दणदणीत विजय मिळवला.वैभववाडी तालुक्याचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप, शिवसेनेने वैभववाडी शहरात संयुक्त मिरवणूक काढून जल्लोष केला. तर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी येथील पक्ष कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. काँग्रेसने ताब्यातील पाच जागा गमावल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे शल्य दिसत होते.वैभववाडी तालुक्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला कधीही यश मिळवता आले नव्हते. मात्र यावेळी दोन पंचायत समिती व एक जिल्हा परिषदेची जागा जिंकून भाजप तालुक्यात काँग्रेसच्या बरोबरीत आला आहे. (प्रतिनिधी)