शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग नगरपंचायतीत युती

By admin | Updated: October 4, 2015 23:36 IST

आरपीआयला बाहेरचा रस्ता :‘९-८चा फॉर्म्युला’ निश्चित

कसई दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप-सेना अशी युती झाली आहे. शेवटच्या क्षणाला आरपीआय पक्षाला बाहेरचा रस्ता दाखवत या निवडणुकीत भाजपला ९ जागा, तर शिवसेनेला ८ जागा असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. युतीच्या सतराही जागा निवडून आणू असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी जाहीर केले.दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना युती करणार हे निश्चित होते. मात्र, एका जागेवरून वाद सुरू होता. एक जागा आरपीआयला सोडली, तर भाजपला आठ जागांवर समाधान मानावे लागणार होते. शेवटच्या टप्प्यात आरपीआयला युतीमधून बाहेर करत भाजप-शिवसेना अशी युती झाली. युतीची घोषणा रविवारी शिवसेनेच्या कार्यालयात एकत्र बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर, गणेशप्रसाद गवस, चेतन चव्हाण, पांडुरंग नाईक, आनंद रेडकर, संजय गवस आदी उपस्थित होते.यावेळी म्हापसेकर यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती व्हावी, अशी आमची इच्छा होती. पदाधिकाऱ्यांचीही तशी मागणी होती. त्यानुसार भाजप-शिवसेना अशी युती झाली आहे. नगरपंचायतीवर युतीचा झेंडा फडकवून पाच वर्षात दोडामार्ग शहराचा विकास करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.दोडामार्ग एस. टी. बसस्थानक, गटार, बायपास रस्ता, मच्छीमार्केट या प्रमुख समस्या सोडवल्या जातील. त्यामुळे मतदारांनी युतीच्या उमेदवाराला विजयी करावे. विरोधकांनी सत्ता असताना दोडामार्गचा विकास केला नाही त्यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहेत. यासाठी सर्व मतदारांनी भाजप-सेना उमेदवारांना मतदान करावे. नगरपंचायत निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. नागरिकांच्या हितालाच प्राधान्य देण्यात येईल, त्यामुळे या निवडणुकीत युतीलाच मतदान करावे, असे आवाहन राजेंद्र म्हापसेकर यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच भाजपत अलिकडेच आले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता नसल्याने निधी आणता आला नाही. मात्र, आता युतीचा झेंडा फडकवल्यास नगरपंचायतीच्या माध्यमातून दोडामार्ग शहराचा विकास करणार असल्याचे बाबुराव धुरी यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)आरपीआय पक्षाला अखेरच्या क्षणी बाहेरचा रस्ता.भाजपला नऊ जागा, शिवसेनेला ८ जागा.युतीच्या सतराही जागा निवडून आणू : सेना, भाजपला विश्वास.एका जागेवरील वादही संपुष्टात.