शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व नुकसानग्रस्तांना लाभ मिळावा

By admin | Updated: May 23, 2015 00:34 IST

आंबा नुकसान भरपाई : कणकवली पंचायत समिती सभा

कणकवली : आंबा नुकसान भरपाईपोटी २०१२ सालासाठी १४ लाख ७९ हजार रूपये प्राप्त झाले. शासन निकषामुळे अनेकांना या भरपाईपासून वंचित रहावे लागत आहे. सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यासाठी कृषीच्या अधिकाऱ्यांनी धोरण ठरवावे, असे आदेश सभापतींनी दिले. पंचायत समितीची मासिक सभा येथील प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात शुक्रवारी सभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती भिवा वर्देकर, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, सहाय्यक गटविकास अधिकारी मुश्ताक गवंडी उपस्थित होते. सभेत एकाही सदस्याचा लेखी प्रश्न नव्हता. मागील इतिवृत्त आढावा घेताना अवकाळीमुळे शेतकऱ्यांची नुकसानभरपाई थकित असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाला. २०११ साली भरपाईपोटी ७५ लाख रूपये प्राप्त झाले. २०१२ साठी १४ लाख ७९ हजार रूपये प्राप्त झाले असून २० गुंठे ते १ हेक्टर पर्यंत लाभार्थ्यांना ही भरपाई मिळणार आहे. तालुक्यात अशाप्रकारे १२५५ लाभार्थी आहेत. मात्र, या निकषामुळे २० गुंठे क्षेत्राखालील शेतकरी वंचित राहणार आहेत, असे सदस्यांनी सांगितले. खरीपासाठी तालुका कृषी विभागाकडून एकात्मिक भात विकास कार्यक्रमांतर्गत संकरीत व सुधारित बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. तालुक्यासाठी १२५ किलो बियाणे उपलब्ध आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ८०० किलो बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. खासगी कृषी सेवाकेंद्र व खरेदी-विक्री संघाकडून ५३८० किलो बियाणे उपलब्ध आहे. ३५९५ मेट्रिक टन रासायनिक खताची तालुक्यात मागणी असून ३०१ टन उपलब्ध आहे. उर्वरित खत येत्या आठ दिवसांत मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ‘सह्याद्री’ बियाणे ४३३ किलो उपलब्ध असून प्रती शेतकरी १ ते ३ किलो दिले जाणार आहे. एमआरईजीएस अंतर्गत तालुक्यात १०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत ३७ लाभार्थी असून १० लाख खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे. अवकाळी पाऊस सतत पडल्याने जमीन थंड झाली आहे. नवीन बियाणे रूजणार की नाही याचा अभ्यास कृषी विभागाने केला आहे का? असा प्रश्न सुरेश सावंत यांनी केला. फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सची बदली झाली असून तेथे तातडीने नर्स द्यावी, अशी मागणी बबन हळदिवे यांनी केली. एनआरएचएमअंतर्गत नर्स द्यावी, असे आदेश सभापतींनी दिले. फोंडाघाट बाजारातील रस्ता दुरूस्त का करण्यात आलेला नाही, याचा संपूर्ण अहवाल मिळण्याची मागणी हळदिवे यांनी केली. फोंडा गांगोवाडी येथे गतिरोधक उभारण्याची सूचना त्यांनी मांडली. बाजारपेठेतील रूंदीकरणाला केव्हा सुरूवात होणार? असा प्रश्नही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. तेराव्या वित्त आयोगातील कामांची मुदत संपत आली आहे. त्या अंतर्गत कामांचा कार्यारंभ आदेश तातडीने दिले जावेत, अशी सूचना सुरेश सावंत यांनी केली. महामार्गावर खारेपाटण ते कणकवली सुलभ शौचालयाची आवश्यकता असल्याची सूचना सावंत यांनी मांडली. (प्रतिनिधी)निधी खर्चाबाबत तपशील द्या : हळदिवेपंचायत समिती कार्यालयात अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी आॅडिट करायचे असून त्यासाठी २ लाख ४० हजार व्याजनिधीतून ४० हजार रूपये खर्च करता येईल, असे विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्वरित निधीचे काय करणार? असा प्रश्न बबन हळदिवे यांनी केला. मागील वर्षी सीसीटीव्हीला सदस्यांनी मंजुरी दिली. मात्र, अद्याप ते बसविण्यात आलेले नाहीत. पंचायत समितीचे प्रवेशद्वाराचे काम इतके वर्षे का राहिले? असा प्रश्न करून आतापर्यंत व्याजनिधीतून कोणत्या कामांवर किती खर्च झाला तो सादर करावा, अशी सूचना हळदिवे यांनी केली.