शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

इंटकच्या राज्यव्यापी संपाला सर्वांचा पाठिंबा

By admin | Updated: December 17, 2015 01:24 IST

अशोक राणे, एच. बी. रावराणेंची माहिती : कणकवलीतील गेट मिटींगमध्ये विविध विषयांवर चर्चा

कणकवली : महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या कणकवली येथे झालेल्या गेट मीटिंग मध्ये १७ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपाला सर्वांनी पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे व सचिव एच. बी. रावराणे यांनी दिली .याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इंटकच्या सिंधुदुर्ग विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी गेट मीटिंग झाली. यावेळी विविध विषय चर्चिले गेले. सन २०१२ ते १६ चा करार मोडीत काडुन तो २५ टक्के वाढीचा करण्यात यावा. यासाठी १७ डिसेंबरला संप पुकारण्याबाबत प्रशासनाला नोटिस देण्यात आली आहे. देशात सर्वात कमी पगार म्हणून एस.टी. महामंडळाची ख्याती आहे. आतापर्यंत मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मान्यतेच्या नावाखाली कामगारांचे कसे आर्थिक नुकसान केले, याची माहिती यावेळी देण्यात आली. कनिष्ठ वेतन श्र्रेणी कर्मचा?्याना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणीचा फायदा द्यावा. २००० ते १२ पर्यंत कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेली आहे. त्यांना नियमित वेतनश्रेणी देऊन वेतन निश्चिति करण्यात यावी. चालक, वाहक रजा व्यवस्थापन संगणकीकृत करण्यात यावे. महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सोई, सवलती देण्यात याव्यात,अशा मागण्यांचा समावेश आहे.हा संप कायदेशीर असून संपाची नोटीस सर्व खात्याना देण्यात आलेली आहे. कामगार संघटनेचे लोक कामगाराचि दिशाभूल करून संपात उतरु नये, असे आवाहन करीत आहेत. परंतु सर्व कामगार सुशिक्षित असून अशा भुलथापाना ते बळी पडणार नाही. त्यामुळे सर्व कामगार संपात सहभागी होणार असून संप यशस्वी करण्यात येईल, असे ही या पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)