शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या तिन्ही पदाधिका-यांनी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ - नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:40 IST

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक या शिवसेनेच्या तिन्ही पदाधिका-यांनी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली.

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक या शिवसेनेच्या तिन्ही पदाधिका-यांनी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली.पडवे (ता. कुडाळ ) येथे पत्रकार परिषदेत राणे यांनी तिघांवरही निशाणा साधला. पालकमंत्री नको ते धंदे करीत सुटले आहेत. या तिघांचेही काम काय ते त्यांनी सांगावे आणि नंतर मते मागावीत, असेही राणे म्हणाले. गेल्या तीन वर्षात रेशनिंगवर धान्य नाही. रॉकेल मिळत नाही. सी-वर्ल्ड, विमानतळाचे काम रखडले आहे. आयटी पार्क, दोडामार्ग एमआयडीसी या महत्त्वाच्या कामांबरोबच जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधा यांची कामे मी केली होती. पण आता कोणतेच काम मार्गी लागलेले नाही.राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांना हे खड्डे बुजविता आले नाहीत. ते जास्त वेळ गोव्यात असतात. हे असेच चालू राहिले तर पालकमंत्र्यांचे सर्व कारनामे उघड करीन, असा इशाराही राणे यांनी दिला.खासदार विनायक राऊत यांच्यावर सडकून टीका करताना राणे म्हणाले, राऊत यांची १३ प्रकरणे मी बाहेर काढीन. त्यांना सभागृहात बोलताही येत नाही. कुठे काय बोलावे, काय करावे तेही कळत नाही. खासदारांनी जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. राणेंची जास्त बदनामी केल्यास पार्ल्याचा इतिहास सांगावा लागेल.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे