शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सिंधुदुर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:33 IST

मराठी परिषद मुुंबईचे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सिंधुदुर्ग येथे होत आहे. या अधिवेशनाच्या यजमानपदाचा मान वसुंधरा विज्ञान केंद्रास मिळाला आहे. अधिवेशन १६, १७ व १८ डिसेंबर असे तीन दिवस नेरूरपार येथील वसुंधरा केंद्र येथे होणार असून उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत. तर समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वसुंधरा केंद्राच्या विश्वस्तांच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्देनेरूरपार येथे १६, १७, १८ डिसेंबर रोजी अधिवेशनगोव्याच्या मुख्यमंत्र्याची उपस्थीती; पाच परिसंवादाचे आयोजनप्रमुख अतिथी म्हणून मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणारसोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर  कविता वाचन करणार

कुडाळ , दि. ३ :  मराठी परिषद मुुंबईचे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सिंधुदुर्ग येथे होत आहे. या अधिवेशनाच्या यजमानपदाचा मान वसुंधरा विज्ञान केंद्रास मिळाला आहे.

अधिवेशन १६, १७ व १८ डिसेंबर असे तीन दिवस नेरूरपार येथील वसुंधरा केंद्र येथे होणार असून उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत. तर समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वसुंधरा केंद्राच्या विश्वस्तांच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या अधिवेशनाचे स्वरूप काय असेल आणि त्या पाठीमागची संकल्पना काय याची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी वसुंधरा विज्ञानकेंद्राचे विश्वस्त सतीश नाईक, अविनाश हावळ, गजानन कांदळगावकर, दिप्ती मोरे, प्रदीप बर्डे, योगेश प्रभू, लक्ष्मीकांत खोबरेकर, अ‍ॅड. सुहास सावंत, डॉ. नंदन सामंत, डॉ. विवेक मंटोरो, गीता महाशब्दे, संध्या तेरसे आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना अविनाश हावळ, सतीश नाईक यांनी सांगितले की, वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास ही संस्था वसुंधरा विज्ञान केंद्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विज्ञान प्रसाराचे कार्य करत आहे. दोन दिवसांच्या मुख्य अधिवेशन कार्यक्रमामध्ये एकूण ५ परिसंवादाचे आयोजन केले आहे.

या परिसंवादाचे अध्यक्षपद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी स्वीकारले आहे. त्यांच्यासोबत डॉ. मिहिर सुळे आणि केतकी जोग हे दोन वैयक्तिक सहभागी होणार आहेत.

सिंधुदुर्गातील सागरीजीव, त्यांचा सहसंबंध व नष्ट होत चालेल्या सागरी प्रजाती या विषयी अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. तसेच बदलत्या हवामानाचा शेतीक्षेत्रावर होणारा दुष्परिणाम व त्यावर मात करून शाश्वत उत्पन्नासाठी शेतकºयांनी केलेले उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. श्रीरंग कद्रेकर, संजय पाटील हे देशी बियाणे संवर्धनासाठी कार्य करतात. शेतकरी आदिवासी यांच्यासोबत त्यांनी तीनशेहून अधिक भाताच्या जातीचे संवर्धन केले आहे. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या पारंपरिक बियाणे संवर्धन यावर पाटील हे माहिती देणार आहेत. 

जैवविविधता-या अधिवेशनात किटक, फुलपाखरे व पक्षी यांचे परागिकरण प्रक्रियेमध्ये खूप महत्त्व असते. त्यांच्यामधील वैविध्य व अधिवास यांचा देखील मागोवा या परिसंवादात घेण्यात येणार आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धन मोहिमेची माहिती देण्याकरिता आंतरराष्टÑीय वन्यजीव व वनस्पतीशास्त्र अभ्यासक डॉ. बिभास आमोणकर येणार आहेत.

नाविन्यपूर्ण महिलांच्या रोजच्या दिनक्रमात सहाय्यभूत होणाºया वस्तू व त्यावर आधारित उद्योग या विषयांवर आधारित परिसंवादामध्ये डॉ. प्रियदर्शनी मार्गदर्शन करणार आहेत. तर गृहिणींना स्वयंपाकघर ही परिपूर्ण अशी रसायन प्रयोगशाळा आहे याची जाणीव डॉ. वर्षा जोशी करून देणार आहेत. प्रयोगातून विज्ञान-वसुंधराची सुरूवात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे ह्या उद्देशाने करण्यात आली. 

सिंधुदुर्गातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी शिक्षण तज्ज्ञांच्या कार्यशाळा वसुंधरामध्ये होतच असतात. या अधिवेशनात सायन्स पार्क पुण्याचे डॉ. कान्हेरे व त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे प्रयोग सादर करणार आहेत. तसेच नवनिर्मिती लर्निंग फाऊंडेशन, पुणे येथील गीता महाशब्दे सर्वांसाठी गणित विषयांवर सादरीकरण करणार आहेत. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर  कविता वाचन करणारतसेच घनकचरा व्यवस्थापनामध्ये सिंधुदुर्गचे नाव राष्टÑीय पातळीवर नेणारे रामदास कोकरे आॅलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन करणारे भाऊ काटदरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम-१५ डिसेंबर रोजी  आबा आमटे यांच्या कवितांवर आधारित कवितावाचनाचा कार्यक्रम ठरविलेला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर सहकाºयांसोबत कविता सादर करणार आहेत.