शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मागण्या पूर्णत्वासाठी संघटनेत एकजूट आवश्यक

By admin | Updated: April 10, 2015 23:51 IST

भिकाजीराव पाटील : कणकवलीत पोलीसपाटलांचा मेळावा; नीतिमत्तापूर्ण वर्तन हवे

कणकवली : पोलीसपाटलांनी समाजात उजळ माथ्याने फिरण्यासाठी नीतिमत्तापूर्ण वर्तन ठेवावे. संघटनेत एकजूट ठेवल्यास सर्व न्याय्य मागण्या मान्य होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष भिकाजीराव पाटील यांनी जिल्हा मेळाव्यात केले. किमानवेतन कायद्याप्रमाणे पोलीसपाटलांचे मानधन ८ हजार रूपये होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस पाटलांचा जिल्हामेळावा शुक्रवारी येथील शिवशक्ती मंगल कार्यालयात झाला. यावेळी राज्य सचिव कमलाकर मांगले, राज्य संघटना सल्लागार अशोक जाधव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष अनंत राणे, उपाध्यक्ष उदय सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष देऊ सावंत, वैभववाडी तालुकाध्यक्ष मनोहर राणे, कर्जत तालुकाध्यक्ष श्रीराम निवणे, सचिव पंकज धरत, रायगड उपाध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार भिकू भोसले आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब शिंदे म्हणाले की, पोलीस पाटलांच्या हिताचे अनेक शासन निर्णय झाले असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी एकजूट दाखवली पाहिजे. कणकवली तालुक्यात पोलीस पाटलाशी उद्धट वर्तन करणाऱ्या उपनिरीक्षकाची गचांडी धरण्याची ताकत पोलीस पाटलात आहे. पुणे येथे पोलीस पाटलाचा अवमान करणाऱ्या निरीक्षकाची १२ तासांत बदली झाली. त्यांना कारवाईचा अधिकार मिळाल्यास गावात सुधारणा होईल. राज्य सचिव कमलाकर मांगले म्हणाले की, पोलीसपाटील पदाच्या नूतनीकरणासाठी चौकशीची अट नको. पाच-दहा वर्षांच्या कार्यकालात तक्रार नसेल तर पदाची मुदत कोणत्याही चौकशी, मेडिकलविना वाढवून मिळावी. राज्यकर्ते अगदी ८५ वर्षानंतरही काम करतात. तर पोलीसपाटलांनाही वयाची अट नको. सक्षम असू तर ६५ वर्षानंतरही नूतनीकरणाची मुदत वाढवून मिळावी. पोलीसपाटलांना ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष असावा असा शासन निर्णय २०११ साली निघूनही अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याची खंत मांगले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) गावात पोलिसांच्या आशीर्वादाने दारूधंदे सुरू असतात. परंतु पोलीसपाटील बदनाम होतो. पोलिसांच्या हाताखाली काम करत असल्याने त्याकडे डोळेझाक करावी लागते. अधीक्षकांनी आमची तपासणी स्थानिक निरीक्षकांच्या अनुपस्थितीत करावी.