शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नौकांवर ‘एआयएस’चा अंकुश

By admin | Updated: June 17, 2015 00:42 IST

प्रविण सौदाणे : सागरी हद्द ओलांडून होणारी मच्छिमारी

मालवण : सागरी हद्दीच्या कारणावरुन प्रत्येक राज्यातील वाद निर्माण होऊन मोठा संघर्ष पेटतो. त्यामुळे परराज्यातील संघर्ष टाळण्यासाठी केंद्र शासनाने देशभरातील १५ मीटर व त्यापेक्षा जास्त लांबीच्या नौकांना ‘एआयएस’ हे उपकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपकरणामुळे मच्छिमारी नौकांचे लोकेशन समजणे सुलभ होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी तटरक्षक व्यवस्थापन अधिकारी प्रविण सौदाणे यांनी मालवण येथे बोलताना दिली.मालवणातील मच्छिमारांसाठी तटरक्षक दलाच्यावतीने शोध व बचावकार्याचे आयोजन मालवण पोलीस वसाहत येथील गणेश मंदिर सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रविण सौदाणे बोलत होते. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, मत्स्य परवाना अधिकारी सुरेंद्र गावडे, सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, सागरी पोलीस अधिकारी प्रकाश सारंग, अनिल साठे, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष छोटू सावजी, बाबी जोगी व इतर उपस्थित होते. मालवणच्या समुद्रात अलिकडेच गोवा व कर्नाटक येथील हायस्पीड पर्ससीन टॉलर्सनी धुमाकूळ घातल्याने मच्छिमारांमध्ये संघर्ष पेटला होता. असे अतिक्रमण सातत्याने होत असून यामुळे स्थानिक मच्छिमारांचे नुकसान होत असल्याने शासन याला लगाम घालणार का? असा प्रश्न यावेळी दिलीप घारे यांनी उपस्थित केला. घारे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण सौदाणे यांनी शासनाने १५ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांबीच्या मच्छिमारी नौकांवर आॅटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम (एआयएस) हे उपकरण बसविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. या उपकरणामुळे एखादी नौका कोणत्या सागरी हद्दीत आहे. याचे लोकेशन मिळणार आहे. यामुळे सागरी हद्द ओलांडून नियमभंग करुन मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई करणे सुलभ होणार आहे. असे सौदाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नौकांची नोंद ठेवाकेंद्र सरकारने काही कडक धोरणे निश्चित केली असून निकामी झालेल्या नौकांच्या नावांवरही डिझेल कोटा उचलला जात असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात किती नौका मच्छिमारी करतात याची नोंद करण्याचे आदेश शासनाने मत्स्य विभागाला दिले आहेत, असेही तटरक्षक व्यवस्थापन अधिकारी प्रवीण सौदाणे यांनी सांगितले.