शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक गोळवली गावचा बेसलाईनसह कृषी सर्व्हे पूर्ण

By admin | Updated: March 26, 2015 00:12 IST

पंचायत समिती : ऊर्जामंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील गोळवली हे केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी दत्तक घेतल्यानंतर या गावचा कृषी सर्व्हे व बेसलाईन सर्व्हे तयार करण्यात आला आहे.पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने गावातील शेतकऱ्यांच्या मागण्यांची सुची तयार करुन ती गोयल यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. गोळवली हे गाव दत्तक घेतल्यानंतर पियुष गोयल या गावाच सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. गोयल यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्यादृष्टीने असणाऱ्या मागण्यांची माहिती संकलीत करुन ती पाठवण्याची सूचना केली होती.याप्रमाणे पंचायत समिती कृषी विभागातर्फे गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला व शेतकऱ्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये तीन शेतकऱ्यांनी बायोगॅस पाहिजे, अशी मागणी केली तर, सहा शेतकरी गांडुळ खतनिर्मितीसाठी आग्रही आहेत. सौर कंदिलासाठी ५६ शेतकरी, पंप पाईप लाईनसाठी २७ शेतकरी, कंपोस्ट खतासाठी ४१ शेतकरी, व विशेष घटक योजनेसाठी २३ शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. दोन हेक्टर क्षेत्रामध्ये आले लागवड, दोन हेक्टरमध्ये हळद लागवड व त्याची दोन प्रात्यक्षिके, चारसूत्री भात लागवडीची २३ प्रात्यक्षिके गावात घेतली जाणार आहेत. त्याचबरोबर गावातील शेतकऱ्यांचा दोन टप्प्यात सहली अभ्यासदौरा काढण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, झाराप व पिंगुळी अशी सहल नेली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी व हिवरे बाजार अशी सहल काढली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग तयार व्हावा, असे अपेक्षित आहे. (वार्ताहर)गोयल यांनी विकासात्मक मागण्यांची माहिती संकलित करण्याची केली होती सूचना.कृषी विभागातर्फे गावातील शेतकऱ्यांशी संवाद.शेतकऱ्यांच्या दोन टप्प्यात कृषी सहली.