शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

राजीनाम्यानंतर प्रभूंनी रेल भवनाकडे फिरवली होती पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:00 IST

अनंत जाधव सावंतवाडी, दि. 4 - एरव्ही अठरा-अठरा तास रेल भवनात बसून देशाच्या रेल्वेत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे सिंधुदुर्गचे सुपूत्र सुरेश प्रभू यांनी उत्तर प्रदेशातील सततच्या दोन अपघातानंतर रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्या दिवसापासूनच प्रभूंनी रेल भवनात जाण्याचे बंद केले होते. तसेच गणेश चतुर्थीच्या काळात मालवण दौ-यावर असतानाही ...

अनंत जाधव सावंतवाडी, दि. 4 - एरव्ही अठरा-अठरा तास रेल भवनात बसून देशाच्या रेल्वेत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे सिंधुदुर्गचे सुपूत्र सुरेश प्रभू यांनी उत्तर प्रदेशातील सततच्या दोन अपघातानंतर रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्या दिवसापासूनच प्रभूंनी रेल भवनात जाण्याचे बंद केले होते. तसेच गणेश चतुर्थीच्या काळात मालवण दौ-यावर असतानाही त्यांनी रेल्वेचा कोणता ही मोठा लवाजमा सोबत बाळगला नव्हता. त्यावेळीच प्रभूंचे रेल्वेमंत्रिपद धोक्यात आल्याचे सर्वजण जाणून होते. पण त्यावर प्रभू मात्र कार्यकर्त्यांशी काही बोलत नव्हते. पण त्यांची देहबोली सर्व काही सांगून जात होती. मात्र यावर रविवारच्या खांदेपालटात शिक्कामोर्तब झाले आणि प्रभूंच्या पदरात उद्योग व व्यापार खाते पडले.केंद्रात भाजपाप्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिले एक वर्ष देशाला रेल्वेमंत्री मिळत नव्हता. मात्र दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना सकाळी भाजपा पक्षात घेतले आणि लागलीच मंत्रिपदाची शपथ देत त्यांच्या डोक्यावर रेल्वे मंत्रालयाचा काटेरी मुकुट घातला. प्रभूंनीही तो समर्थपणे पेलला. रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल घडवायच्या उद्देशाने ते देशात कमी तर दिल्लीतील रेल भवनात अधिक दिसायचे. रेल्वेमध्ये बाहेरची गुंतणवूक आणली तर रेल्वे कधीही तोट्यात जाणार नाही अशी त्यांनी मनाशी पक्की खुणगाठ बांधली होती. म्हणूनच ते सतत रेल्वेत बदल घडवून आणण्याच्या मागे होते. त्यांनी आपल्या रेल्वेमंत्री पदाच्या काळात अनेक न