शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वृक्षांच्या तोडीनंतर वाहतूक पास द्याव

By admin | Updated: March 12, 2015 00:04 IST

प्रमोद जठार : ‘ती’ अट रद्द करण्याची उपवनसंरक्षकांकडे मागणीे

सावंतवाडी : जिल्ह्यातील मालकी वृक्षाच्या तोडीनंतरच्या वाहतूक प्रकरणी लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या अटी तत्काळ रद्द करा. या दाखल्याच्या अटीमुळे शेतकऱ्यांनी तोडलेली झाडे पावसामध्ये कुजून जात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या दाखल्याच्या अटी रद्द करून तोडलेल्या झाडांची वाहतूक परवाने पास देण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी व जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांच्याजवळ बुधवारी केली. यावर उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी दोन शेतकऱ्यांचे वाहतूक पास व लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून १३ मार्च रोजी यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंगेश तळवणेकर, बळीराम सावंत, सुरेश सावंत, शकील शेख व शेतकरी उपस्थित होते. खासगी मालकी क्षेत्रातील निबंधित अधिसूचित वृक्षतोड करण्यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८४ नुसार वृक्ष अधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाते. तसेच जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटर अंतरावरील अति उतारावरील, तसेच एकटी २० झाडे राखून न ठेवता वृक्षतोड करावयाची असल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम तरतुदीनुसार महसूल विभागाकडील परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु निर्बंधक किंवा अनिर्बंधित झाडांची तोड जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटरच्या आत व्यावसायिक करीत नाहीत. शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेल्या वृक्षतोडीबाबत एकही तक्रार वनविभाग किंवा महसूल विभाग यांच्याजवळ नाही, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले. तर तोडलेल्या झाडांसाठी तत्काळ वाहतूक पास द्या. अन्यथा येथून हलणार नाही, असा पवित्रा प्रमोद जठारांसह सर्व शेतकऱ्यांनी घेतला. यावर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तत्काळ दोन शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले. तर इतर शेतकऱ्यांच्या परवान्यांसंदर्भात दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)