शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या हल्ल्यानंतर ‘तिने’ दोन दिवस काढले जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:57 IST

दोडामार्ग : तालुक्यातील बांबर्डे येथील अश्विनी आप्पासाहेब देसाई (४५) ही महिला लाकडे आणण्यासाठी शुक्रवारी लगतच्या रानात गेली असता रानटी ...

दोडामार्ग : तालुक्यातील बांबर्डे येथील अश्विनी आप्पासाहेब देसाई (४५) ही महिला लाकडे आणण्यासाठी शुक्रवारी लगतच्या रानात गेली असता रानटी हत्तीने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. मात्र, जंगलमय भागात घडलेल्या या घटनेची माहिती कोणालाच नसल्याने ही महिला तब्बल दोन दिवस घटनास्थळीच पडून होती. अखेर तिची आर्त हाक अखेर रविवारी तुषार गावडे यांनी ऐकली आणि त्यांनी धावाधाव करून ग्रामस्थांच्या मदतीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी तिला गोवा येथे हलविण्यात आले.हत्तींच्या उपद्र्रवामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हेवाळे, बांबर्डे, खराडी, बाबरवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे जीवन हलाखीचे बनले आहे. उद्ध्वस्त होणाऱ्या शेती-बागायतीबरोबरच आता शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतले आहे. अशीच घटना शुक्रवारी एका निराधार महिलेच्या बाबतीत घडली. बांबर्डे येथील अश्विनी देसाई ही महिला लाकडे आणण्यासाठी शुक्रवारी लगतच्या रानात गेली होती. तेथे रानटी हत्तीने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात तिच्या डाव्या पायाला व पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, ही जागा मनुष्यवस्तीपासून दूर असल्याने याबाबत कोणालाच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अश्विनी ही त्याच अवस्थेत तब्बल दोन दिवस भुकेने व तहानेने विव्हळत पडली होती.भूक आणि आणि तहानेने जीव व्याकुळ झाल्याने त्याच अवस्थेत घसरत घसरत अश्विनीने रविवारी काही अंतरावर असलेल्या नदीचा तीर गाठला आणि जीवाच्या आकांताने टाहो फोडला. लगतच्या केळी बागायतीत असलेल्या तुषार गावडे यांनी तिचा आवाज ऐकला आणि त्यांनी लागलीच त्या दिशेने धाव घेतली. वस्तुस्थिती पाहताच गावडेही काही वेळ सुन्न झाले. अखेर ग्रामस्थांच्या सहाय्याने त्यांनी अश्विनी हिला दोडामार्ग रुग्णालायात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिला बांबोळी-गोवा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.