शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

संधीचा फायदा जनतेसाठी

By admin | Updated: December 17, 2014 22:54 IST

दिनेश साळगावकर : पक्षबांधणीसाठी काम करणार

कुडाळ : काहीजणांच्या मते कुडाळ तालुका काँगे्रसचे तालुकाध्यक्षपद हे जरी काटेरी मुकुट असले, तरी माझ्या मते तो काटेरी मुकुट नसून मला मिळालेली संधी आहे. या संधीचा फायदा मी जनतेसाठी व पक्षबांधणीसाठी करणार असल्याचे वक्त व्य काँगे्रसचे नूतन तालुकाध्यक्ष दिनेश साळगावकर यांनी केले. यापुढे निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी कुडाळ तालुका काँग्रेसच्या नूतन तालुकाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश साळगावकर यांची निवड केली. तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साळगावकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे संजय पडते, अस्मिता बांदेकर, आनंद शिरवलकर, विकास कुडाळकर, माजी तालुकाध्यक्ष प्र्रकाश मोर्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, प्रसाद पोईपकर, राकेश कांदे आदी उपस्थित होते. यावेळी साळगावकर म्हणाले, लोकसभा व विधानसभेतील पराभवामुळे आम्ही १० वर्षे मागे आलो असून पुन्हा शुन्यातून सुरुवात करणार आहोत. ही सुरुवात करताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्षसंघटना मजबूत करणार आहोत. पक्षाचे आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी व कुडाळातील पदाधिकारी व नेते या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे, ती सर्वांना बरोबर घेऊन समर्थपणे पेलणार आहे, असा विश्वास साळगावकर यांनी व्यक्त केला. या तालुक्यातील आकारीपड, वनसंज्ञा, हत्तीप्रश्न तसेच इतर प्रश्न समस्यांबाबत सत्ताधाऱ्यांकडून योग्य न्याय न मिळाल्यास वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी दिनेश साळगावकर यांनी दिला. (प्रतिनिधी)स्थानिक स्वराज्य संस्थेत आमचीच सत्ताजिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्ह्यातील ८० टक्के ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता असून याचा उपयोग जनतेच्या विकासासाठी करणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले. चतुर्थी सणात धूप, अगरबत्ती वाटून जनेतला भावनिक बंधनात टाकून विजय मिळविणारे आमदार वैभव नाईक हत्तीप्रश्नी गप्प का, असा सवाल साळगावकर यांनी उपस्थित केला. सत्ताधारी भाजप पक्ष विकासाच्या बढाया मारीत असून विकास कोणता करणार, ते मात्र अजून उघड केलेले नाही. त्यामुळे त्यांनी बढाया मारू नये.या जिल्ह्यात विकास फक्त नारायण राणे यांनीच केला असून त्यांनी केलेला विकास टिकविण्याचे कामच सत्ताधाऱ्यांनी करून दाखवावे.