शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जलसमाधीचा निर्णय स्थगित; आंदोलन सुरूच

By admin | Updated: April 20, 2015 00:22 IST

तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न : झटापटीनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविले

कसई दोडामार्ग : पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन धुडकावून लावत तिलारी धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पोलिसांनी अडविल्यामुळे जलसमाधीचा निर्णय स्थगित केला. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांत काहीकाळ झटापटही झाली. यानंतर आंदोलन सुरूच ठेवून शासन निर्णयाची वाट पाहणार व त्यानंतर पुन्हा जलसमाधीचा निर्णय घेऊ, असा इशारा रविवारी आंदोलनकर्त्यांनी दिला. तिलारी प्रकल्पग्रस्तांची वनटाईम सेटलमेंट रक्कम न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली होती. रविवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. प्रकल्पग्रस्त आपल्या मागणीसाठी जलसमाधी घेणार, या निर्णयावर ठाम राहिल्याने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दुपारी ग्रामविकास, वित्तमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन चर्चा केली. गोवा राज्याने वनटाईम सेटलमेंटची तरतूद केली आहे. महाराष्ट्र शासनाकडे तुमचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्या, मंगळवारी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये वनटाईम सेटलमेंटच्या रकमेबाबत अंतिम निर्णय घेऊन महिन्याच्या आत जीआर काढून रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. दरम्यान, याआधीही केसरकर यांनी आश्वासने दिली होती. त्यामुळे आंदोलनाचे नेते संजय नाईक यांनी आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा घेतला. तत्पूर्वी आंदोलनकर्ते ‘आम्हाला न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत जलसमाधी घेण्यासाठी जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी त्यांना साखळी करून अडवून ठेवले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन झटापटही झाली. पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांनी प्रकल्पग्रस्तांना सुनावले की, तुम्ही कायदा हातात घेतला, तर आम्हालाही कायदा हातात घेऊन अटक करावी लागेल, असे सुनावले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवून जलसमाधीचा निर्णय स्थगित केला, परंतु उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा संजय नाईक यांनी दिला. (वार्ताहर)