शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

‘शैरानी’ची चार पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई

By admin | Updated: September 24, 2015 23:53 IST

आठ खलाशी ताब्यात : ३ रत्नागिरीतील, १ मालवणातील

मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ गेले आठ दिवस सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या आक्रमक मागणीनंतर मत्स्य विभागाच्या ‘शैरानी’ गस्ती नौकेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री मालवण समुद्रात १५ वाव खोल मासेमारी करणाऱ्या चार पर्ससीन ट्रॉलर्स आणि आठ खलाशांना ताब्यात घेतले. यात रत्नागिरीतील तीन, तर मालवणमधील एका ट्रॉलरचा समावेश आहे. दरम्यान, चारही ट्रॉलर्सच्या कारवाईचा प्रस्ताव मालवण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. मत्स्य विभागानेही धडक कारवाई दिवस-रात्र सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन व हायस्पीडचा धुमाकूळ राजरोसपणे सुरू आहे. पारंपरिक मच्छिमारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मत्स्य विभागाने गेल्या दोन दिवसांपासून दिवस-रात्र गस्त सुरूकेली आहे. मंगळवारी रात्री गस्ती नौकेने तीन ट्रॉलर्स पकडले होते. मात्र, त्यांच्याकडे परवाना असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती, तर बुधवारी ‘शैरानी’ने रात्रीपासून सुरूकेलेली गस्त पहाटे सहा वाजेपर्यंत सुरूठेवत चार ट्रॉलर्सवर कारवाई केली. (प्रतिनिधी)आठपैकी चौघांवर कारवाईमत्स्य विभागाच्या बुधवारी रात्रीच्या गस्त मोहिमेत शैरानीच्या कारवाई पथकाने आठ पर्ससीन ताब्यात घेतले. यापैकी सुधाकर मोंडकर (धनसागर), आरिफ दर्वे (सलमा खातू), विकास सावंत (हेरंब) या तीन रत्नागिरी येथील पर्ससीन ट्रॉलर्सवर परवाना, तर मालवण येथील रवींद्र रेवंडकर (चंद्रिका) यांच्याकडे पर्ससीन विमा परवाना नसल्याने एकूण चार ट्रॉलर्सवर कारवाई केली. प्रत्येक नौकेतील पागी व खलाशी अशा दोघांना चौकशीसाठी व जबाब नोंदणीसाठी गस्ती नौकेतून मालवणात आणण्यात आले.तहसीलदार काय करणार ?मासेमारी हंगाम सुरू होताच पर्ससीनच्या या अतिक्रमणाबाबत समुद्र्रात आंदोलन छेडणाऱ्या महेंद्र पराडकर यांना मत्स्य विभागाने कारवाईचे आश्वासन दिले होते, तर तहसीलदार यांनी कठोर कारवाई अनधिकृत पर्ससीनवर केली जाईल. मत्स्य विभागाने कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मत्स्य विभागाने चार पकडलेले पर्ससीनचे प्रस्ताव तयार झाले आहेत. आता तहसीलदार कोणती कारवाई करतात? याकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले आहे.