शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पिंगुळी येथे महामार्गावर अपघात; रिक्षाचालकाचा मृत्यू

By admin | Updated: November 25, 2015 23:47 IST

ट्रकचालक ताब्यात

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश येथे ट्रक व रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक महेश मल्ला पाटील (वय ३२, रा. साळगाव) हा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत वृत्त असे की, कुडाळहून झारापकडे रिक्षा घेऊन महेश पाटील जात होता. याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालक सलीम शेख (रा. जालना) याचा ताबा सुटला. त्याने विरुद्ध दिशेला ट्रक घेऊन महेश पाटीलच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्याने रिक्षाला १५ ते २0 फुटांपर्यंत लांब फरफटत नेले. यात पाटील जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रिक्षाचालक महेश पाटील झारापमध्ये व्यवसाय करीत होता. बुधवारी दुपारी तो कुडाळला प्रवासी भाडे घेऊन आला होता व पुन्हा झाराप येथे परतत होता. सुदैवाने या रिक्षामध्ये कोणीही प्रवासी नव्हते. (प्रतिनिधी)रिक्षामध्ये अडकला महेश या भीषण अपघातात रिक्षामध्ये महेश अडकून पडला होता. त्याला ग्रामस्थांनी तत्काळ बाहेर काढत कुडाळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डोक्याला व छातीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महेश आज मुंबईला जाणार होता महेशची पत्नी, मुलगा व मुलगी मुंबईला नातेवाइकांकडे गेले होते. त्यांना आणण्यासाठी महेश आज, गुरुवारी मुंबईला जाणार होता. मात्र, काळाने याअगोदरच त्याच्यावर घाला घातला. या अपघाताची नोंद कुडाळ पोलिसांत झाली असून, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांनी पंचनामा केला. ट्रकचालक सलीम शेख याला ताब्यात घेतले असून, याबाबत अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.