शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

धोकादायक थांब्यांमुळे अपघात

By admin | Updated: September 23, 2016 23:11 IST

७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे धोकादायक

विशाल रेवडेकर ल्ल फोंडाघाट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द असलेल्या खारेपाटण ते कणकवली ओसरगाव महिला भवनपर्यंत एस.टी. प्रशासनाचे तब्बल ७० टक्क्यांपेक्षा जास्त थांबे हे धोकादायक वळणावर आहेत. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातांना हे थांबेदेखील कारणीभूत ठरत आहेत. ‘एस.टी.चे हे थांबे अजून किती जणांचे जीवन थांबविणार?’ असा प्रश्न यानिमित्ताने वाहतूकदारांमधून उपस्थित होत आहे. असं म्हटलं जातं की, एखाद्या घटनेत वित्तहानी सोडाच जीवितहानी होत नाही, तोपर्यंत प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना जाग येत नाही. मग ते महामार्गावरील खड्डे असो किंवा अपघात. मागील अनेक वर्षांपासून एस.टी. प्रशासनाचे अगदी वडिलोपार्जित म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे ‘विनंती थांबा’ जरी इतिहासजमा झाले असले, तरीदेखील प्रवासी ‘वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बसथांब्यावर थांबतात. मात्र, कधी धोकादायक ठिकाणी असलेले हे थांबे अनेक लोकांचे जीवन थांबविताना दिसतात. बसथांब्यावर धोकादायक ठिकाणी बस थांबून झालेल्या अपघातात जीव गमवावे लागतात. जानवली-गावठणवाडी येथील बसथांब्यावर एस.टी. बस प्रवासी घेण्यासाठी थांबली असताना, त्याच्या मागून दुचाकीस्वार आणि आयशर टेम्पोही थांबला. त्याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने टेम्पोला मागून धडक दिल्याने टेम्पो मोटारसायकलवर आदळला. या अपघातात टेम्पो आणि एस.टी. बस या दोन वाहनांमध्ये चिरडून दुचाकीस्वार दीपक पांडुरंग राणे (३५ रा. कुणकवण) आणि संदीप पांडुरंग राणे (४२) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. यातील दीपक राणेंच्या डोक्याला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले, तर संदीप राणे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या तिहेरी अपघातप्रकरणी नडगीवे येथील विठू माऊली अर्थात व्ही.एम. ट्रॅव्हल्सचा चालक बोटीचंद राजभर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तरीदेखील हे प्रकरण संपले का? निश्चितच नाही. नेमका दोष कोणाचा ? जानवली येथील थांब्यावर झालेल्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्याला गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे. तरीदेखील प्रशासन सुस्तच राहणार का? कारण हा अपघातात सर्वांच्यादृष्टीने लक्झरी चालक दोषी असल्यानेच प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याची शिक्षा त्याला न्यायालयाकडून मिळेलही किंवा मृत व जखमी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेलही, परंतु कुटुंबातील गेलेला कर्ता तर मागे येणार नाही ना? मग यात नेमका दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धोकादायक वाहतूक थांबे महामार्गावर बुधवारी झालेल्या अपघातात एकाचा जीव गेला असला, तरी या अपघाताचे ठिकाण पाहता एस.टी. चालकाने जानवली-गावठणवाडी या थांब्यावर बस प्रवाशांसाठी उभी केली होती ते ठिकाण वाहन उभे करण्यास योग्य होते का ? वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करत असतातच. मात्र, महामार्गावर वाहने उभी करण्याचेदेखील काही नियम आहेतच ना? मग धोकादायक वळणावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे व तेही महामार्गावरील, हे या अपघाताचे मूळ कारण आहे. यात बसचालकाची चूक निश्चितच नसेलही. कारण बस थांब्यावरील प्रवासी न घेता पुढे गेला असता तर कदाचित त्याच्यावरदेखील खात्याकडून कारवाईचा बडगा होताच. वाहतूक नियम फक्त सामान्यांसाठीच का ? महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यात खूप मोठ्याप्रमाणात एस.टी.चे अपघात वाढत चालले आहेत. नियम धाब्यावर बसवून गाडी चालविणे, धोकादायक ठिकाणी गाडी उभे करणे, विशेषत: गाडी उभी करताना मागील किंवा पुढील वाहनाला कोणतीही सूचना न देणे हे नियम पाळले जात नाहीत. मात्र, हे नियम सर्वसामान्यांसाठी असतात का? शासकीय वाहनांना यात सूट दिली जाते का? असा सवाल वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे. महामार्गावर एस.टी. बसेसचे असलेले अनधिकृत थांबे हा एक धोका वारंवार दुर्लक्षिला जातो. कणकवली शहरात मध्यवर्ती तायशेटे हॉस्पिटलजवळील थांबा बसमधूनच उतरलेल्या प्रवाशांचा बऱ्याचदा बळी घेणारा ठरला आहे आणि असे अनेक जीवघेणे थांबे स्वतंत्र लेन करून सुरक्षित करावेत म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या समितीच्या बैठकीत गेल्या २0 वर्षांत वारंवार मांडले गेले आहेत; परंतु महामार्गाच्या सार्वजनिक बांधकामकडून दखल घेतली गेलेली नाही. आता तर महामार्गाचे रूंदीकरण या मथळ्याखाली आणखी दोन वर्षे असेच अपघातकर्ते थांबे सिंधुदुर्गवासीयांना सहन करावे लागणार आहेत. -अशोक करंबेळकर, अध्यक्ष, प्रवासी संघटना, कणकवली.