शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची लगबग

By admin | Updated: September 23, 2016 23:05 IST

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सुनील गोवेकर ल्ल आरोंदा गणेश चतुर्थीचा उत्सव आता संपतो न संपतो तोच जिल्ह्याला नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात दांडिया, गरबा या नृत्यांसह भजने, डबलबारी यांच्या तयारीची लगबग पाहावयास मिळत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवातही गावागावांत सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम पाहावयास मिळणार आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील नवरात्रौसव मंडळे कार्यरत झाली असून, स्थानिक कलाकारांना नव्याने व्यासपीठ मिळणार आहे. गणेश चतुर्थीचा सण जवळपास संपलेला असून, नऊ दिवसांची सांस्कृतिक मांदियाळी असलेला नवरात्रौसव आता सुरू होणार आहे. दांडिया ग्रुप, डबलबारी करणारे भजनी बुवा, भजनी मंडळे, दशावतार, गाण्याचे कार्यक्रम करणारे विविध वाद्यवृंद, आॅर्केस्ट्रा, नृत्यात निपुण असणारे कलाकार अशा सर्वच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील विविध शहरी भागांबरोबरच आता ग्रामीण भागातूनही गेल्या काही वर्षांत नवरात्रौसव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवींच्या मंदिरातून नवरात्रौसव साजरा करण्याची परंपरा आधीपासूनच असली, तरी दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात सादर करण्याची परंपरा अलीकडील काही वर्षांपासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नवरात्रौत्सव उत्सवातील नऊ रात्री जागणार आहेत. दांडिया, गरबा नृत्य हे मुळात गुजरातचे असले, तरी हे नृत्य तरुण वर्गाला भुरळ पाडणारे असल्याने गावागावांतून दांडिया ग्रुप निर्माण होत आहेत. गावागावांतील नवरात्रौत्सव मंडळांमार्फत दांडिया स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे चांगले नृत्य सादर करणाऱ्या ग्रुपसाठी आर्थिक फायदा होत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी दांडिया ग्रुप आतापासूनच सरावात गुंतलेले आहेत. तरुणाईसाठी दांडिया हा प्रकार आकर्षण असल्याने तरुण, तरुणी या नृत्य प्रकाराकडे वळत आहेत. डबलबारीचे खास आकर्षण जिल्ह्यात भजन, दशावतार या कलांना अच्छे दिन असून, नवरात्रौत्सवामध्येही या कलाकारांची चलती असणार आहे. भजन मंडळांसाठी नऊ दिवसांत विविध ठिकाणी कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असणार आहे. तर नवरात्रौत्सव मंडळाच्या माध्यमातून दशावतारी नाट्यमंडळांनाही कलेसाठी व्यासपीठ निर्माण होणार आहे. संगीत भजनाच्या डबलबाऱ्यांंचे आयोजन नवरात्रौत्सव कालावधीत केले जाते. आजही प्रेक्षकांसाठी भजनी बाऱ्यांचे आयोजन हे खास आकर्षण ठरत आले आहे. जिल्ह्यातील नामवंत बुवांच्या डबलबाऱ्यांचे आयोजन तसेच तिरंगी भजनांचे सामने रंगणार आहेत. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या प्रकाराला प्रेक्षकांची आजही पहिली पसंती असल्याचे दिसून येते.