शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन ई-संजीवनीचा ९५ रुग्णांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 15:14 IST

Online Medical Help sindhudurg-ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरकडे जावे लागत नाही, तर डॉक्टर एका क्लिकवर रुग्णांना मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. या सेवेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना ई-संजीवनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देऑनलाईन ई-संजीवनीचा ९५ रुग्णांनी घेतला लाभश्रीपाद पाटील यांची माहिती : डॉक्टर एका क्लिकवर मोबाईलवर उपलब्ध

ओरोस : हॅलो... डॉक्टर साहेब, घसा दुखतोय, खोकला आहे... असा संवाद जिल्हा रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टरांत होत आहे. ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना डॉक्टरकडे जावे लागत नाही, तर डॉक्टर एका क्लिकवर रुग्णांना मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. या सेवेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९५ रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना ई-संजीवनी योजनेचा लाभ घावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारावर सल्लामसलत करण्यासाठी, रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात रांगेत उभे रहावे लागू नये, ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा व तालुकास्तरावर येण्यासाठी लागणारा आर्थिक भूर्दंड कमी व्हावा यासाठी शासनाने ऑनलाईन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यात मे २०२० पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्षात ही योजना नोव्हेंबर २०२० नंतर सुरू करण्यात आली आहे.

याबाबत डॉक्टरांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. ई-संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. तसेच ही सेवा www.esanjeevaniopd.in   या वेबसाईटच्या माध्यमातून लॅपटॉप व संगणकावरून घेता येते. ही सुविधा सकाळी ९:३० ते १:३० तर दुपारी ३ ते ५ या वेळेत उपलब्ध असणार आहे. तर रविवारी ही सुविधा उपलब्ध नसेल. सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना अँड्रॉईड मोबाईलद्वारे ह्यई-संजीवनी ओपीडीह्ण या संकेतस्थळावर किंवा ह्यसंजीवनी ओपीडी अ‍ॅपह्णद्वारे नोंदणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेता येतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयsindhudurgसिंधुदुर्ग