शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के शाळांना क्रीडांगणे नाहीत

By admin | Updated: May 29, 2016 00:28 IST

एक लाखाचे अनुदान : खेळाडू निर्मितीत मोठी अडचण

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २४९८ प्राथमिक शाळांना क्रीडांगणे नाहीत. तब्बल ९० टक्के शाळांमध्ये क्रीडांगणे नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये खेळाडू निर्माण होण्यास ही मोठी अडचण ठरत आहे. तरीही शिक्षकवर्गाकडून खेळाडू निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण २७८६ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये प्राथमिक (इयत्ता १ ते ४) १६७८, उच्च माध्यमिक (इयत्ता १ ते ७ ते ४ ते ७) १०९९ व माध्यमिक व उच्च माध्यमिक ९ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गतवर्षी शैक्षणिक माहिती प्रणालीवर आधारित संक्षिप्त सांख्यिकीय माहितीचा अहवाल शासनाला सादर केला होता. या अहवालानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांची माहिती एकत्रित करुन ती शासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा पायाभूत भौतिक सुविधांपासून अजूनही वंचित आहेत. त्यामध्ये अपंगांसाठीचे रॅम्प, स्वयंपाकगृह, संरक्षक भिंत, क्रीडांगण तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी किमान एक वर्गखोली असणेही आवश्यक आहे. पूर्वी क्रीडांगणाचा विचार न करता विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या हेतूने ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा उभारण्यात आल्या होते. त्यासाठी अनेकांनी आपल्या जमिनी शासनाला दिल्या. त्यामुळे आज ग्रामीण भागामध्ये शाळा दिसत आहेत. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेजारील शेतांच्या मळ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. (शहर वार्ताहर)