शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ८८.७६ टक्के घरपट्टी वसूल

By admin | Updated: April 6, 2016 23:46 IST

पाणीपट्टी ८० टक्के वसूल : कर न भरणाऱ्या ५६ नळधारकांंची जोडणी तोडली

चिपळूण : येथील नगरपरिषदेची २०१५ - १६ मार्चअखेरची घरपट्टी वसुली ८८.७६ टक्के, तर पाणीपट्टी वसुली ८० टक्के झाली आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्या ५६ जणांवर कारवाई करुन त्यांची नळजोडणी तोडण्यात आली आहे.चिपळूण नगर परिषदेने वसुली मोहीम तीव्र केली आहे. थकबाकीदारांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे वसुलीत पालिकेने आघाडी घेतली आहे. नगरपरिषद हद्दीत एकूण १८ हजार ९५२ घरे असून, सर्व करदात्यांना घरपट्टी भरण्याबाबत बिलांचे वाटप करण्यात आले होते. करदात्यांना मार्चअखेर रक्कम भरता यावी, यासाठी सुटीच्या दिवशीही सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात आले होते. चालू वर्षाची एकूण मागणी ९.५० लाख होती. त्यापैकी ६.८७ लाख वसुली झाली आहे. काही करदात्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही सुरु आहे. शहर व परिसरात ७ हजार ५५ नळधारक असून, १ कोटी २६ लाखांपैकी १ कोटी ३० हजार रुपये म्हणजेच ८० टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. ज्या नळधारकांनी ठरलेल्या मुदतीत पाणीपट्टी भरलेली नाही, अशा ५६ जणांची नळजोडणी बंद करण्यात आली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी करदात्यांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन करभरणा करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजू खातू यांच्यासह प्रभागनिहाय वसुलीप्रमुख व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.चिपळूण नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता स्वतंत्र विभागप्रमुख काम पाहात असून, खेर्डी पंपहाऊस येथून पाण्याचा उपसा करुन हे पाणी शहर व परिसराला पुरविले जाते. गोवळकोट येथेही पंपहाऊस आहे. पाणी उचलण्यासाठी वर्षाला सुमारे १ लाख ४० हजारपर्यंत विजेचे बिल येते. पाणी योजना तोट्यात असली तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नळांना मीटर बसवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. गेल्यावर्षीपासून ९०० रुपयांऐवजी १२०० रुपये पाणीपट्टी करण्यात आली आहे. (वार्ताहर)नगर परिषदेला पाणी, घरपट्टी, वृक्ष कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, अग्निशमन कर आदींच्या माध्यमातूनही आर्थिक उत्पन्न मिळत असते. यावर्षी वृक्षकर ८४.९७ टक्के, शिक्षण कर ८६.६५ टक्के, रोजगार हमी कर ८३.९५ टक्के, अग्निशमन कर ८०.१९ टक्के अशी एकूण नगर परिषदेची ८७.८३ टक्के करवसुली झाली आहे.