शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
4
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
5
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
6
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
7
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
8
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
9
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
10
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
11
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
12
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
13
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
14
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
15
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
16
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
18
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
19
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा

८२ टक्के लोकांचा ‘आधार’ नक्की

By admin | Updated: December 30, 2014 23:32 IST

नागरिकांची पळापळ : सर्वच सरकारी कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य होणार!

रत्नागिरी : शासन आता सर्वच कामांसाठी आधारकार्ड अनिवार्य करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढली नाहीत किंवा ज्यांची अद्याप मिळाली नाहीत, अशांची पुन्हा आधार नोंदणी केंद्राकडे पळापळ सुरू झाली आहे. ग्लोडाईननंतर आता स्पॅन्को कंपनीने आधारकार्डचे काम घेतले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,३२,९२६ (८२.६५ टक्के) इतक्या आधारकार्डचे काम झाले आहे. राज्यातील आधारकार्डचे काम करण्यासाठी शासनाने ग्लोडाईन या कंपनीकडे काम दिले होते. पण, पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याचे केवळ ३५ टक्के काम झाल्यानंतर या कंपनीने काम अचानक सोडून दिले. १२ जानेवारी २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १६,१२,६७२ लोकसंख्येपैकी केवळ ६,४३,५८२ एवढ्याच आधारकार्डचे काम झाले होते. त्यानंतर विविध शिष्यवृत्ती, विविध योजनांचे अनुदान, गॅस सिलिंडरची सबसिडी आदींसाठीही आधारकार्ड सक्तीचे केल्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू झाली. जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून आधारकार्ड नोंदणीची ४५ मशिन्स प्राप्त झाली होती. पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील काम स्पॅन्को कंपनीला दिले. तसेच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या आधारकार्ड मशिन्सपैकी १७ मशिन्स जिल्ह्यातील १७ अधिकृत गॅस एजन्सीधारकांना त्यांच्या ग्राहकांना आधारकार्ड सुविधा मिळावी म्हणून दिले.तसेच सर्व तहसील कार्यालयाकडेही प्रत्येकी एक मशीन देण्यात आले. १ जानेवारी २०१३ पासून जिल्ह्यात स्पॅन्को कंपनीतर्फे आधार कार्ड नोंदणीला सुरूवात झाली. स्पॅन्को कंपनीने २५ फेब्रुवारी २०१३ ते ३० डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण केलेली तसेच गॅस एजन्सी, प्रशासन यांच्या माध्यमातून आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील १३,३०,०६८ इतक्या आधारकार्डचे काम झाले आहे. त्यामुळे आता उर्वरित १७.३५ टक्के आधारकार्डचेही काम लवकरच पूर्णत्वाला जाईल, असा विश्वास स्पॅन्को कंपनीचे चंद्रकांत कदम यांनी विश्वास व्यक्त केला.सध्या जिल्ह्यात ३१ महा - ई सेवा केंद्रांतर्फे आधारकार्डचे काम सुरू आहे. ज्यांनी अजूनही आधारकार्ड काढली नाहीत वा ज्यांची अद्याप मिळालेली नाहीत, त्यांनी आधारकार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)१३ लाख कार्डाचे काम पूर्णतालुकापहिला डिसे.१४टप्पाअखेरमंडणगड४२,३११३७०७५३दापोली६२,१७८१७५६४६ खेड८१,८१६१६३७०६ चिपळूण९९,९३११६३००२ गुहागर७१,३२४१११७७६ संगमेश्वर१,०३,१२९११०४२५ रत्नागिरी१,२९,४४२१०४९३३लांजा४५,६६१९४४६५राजापूर ५९,६७३३८२१९एकूण६,९५,४६५१३,३२,९२६जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून आधारकार्ड नोंदणीची ४५ मशिन्स प्राप्त.स्पॅन्को कंपनीने २५ फेब्रुवारी २०१३ ते ३० डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण केलेली तसेच गॅस एजन्सी, प्रशासनव्दारे १३,३०,०६८ आधारकार्डचे काम पूर्ण.