शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: सावंतवाडी एसटी आगारातील ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी, तुरळक सेवा सुरु

By अनंत खं.जाधव | Updated: September 4, 2024 16:26 IST

प्रवाशाचे हाल, बाजारपेठेवर मोठा परिणाम 

सावंतवाडी : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून ही त्याची कोणतीही दखल न घेण्यात आल्याने काल, मंगळवारपासून सुरू असलेला संप आज बुधवारी दुसऱ्या दिवशी कायम होता. सावंतवाडी एसटी आगारातील तब्बल ८० टक्के कर्मचारी संपात सहभागी झाल्याने तुरळक एसटी सेवा सुरू होती. लांबच्या प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसला.सकाळच्या सत्रात अधिकाऱ्यांनी विनवणी करूनही चालक वाहक सेवेत रुजू झाले नसल्याने प्रवासी ही चांगलेच खोळंबले होते. सावंतवाडी एसटी आगार ठप्प झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपाचा सर्वात मोठा फटका हा सावंतवाडीला बसला असून जिल्ह्यातील इतर तालुक्यात तुरळक एसटी सेवा सुरू होत्या. काही कर्मचारी सेवेत रुजू असल्याने तालुक्यातील काही गावांमध्ये एसटी सेवा सुरू ठेवल्या. पण लांब पल्ल्याच्या गाड्यांना ब्रेक लागल्याने प्रवासी बस स्थानकात अडकून पडले होते.उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनवणी केली पण कर्मचाऱ्यांनी सेवेत रुजू होण्यास नकार दिला. सावंतवाडी एसटी आगाराचे प्रमुख निलेश गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईकडे नेहमी १८ बसेस जातात पण सध्या १६ बसेस पूर्ण पणे बंद आहेत. शाळेच्या मुलांना ने आण करण्यासाठी काही कर्मचारी सेवेत आहेत.बाजारपेठेवर मोठा परिणाम एसटी सेवा ठप्प झाल्याने याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. गणेश चतुर्थीच्या तोंडावर संप पुकारल्याने बाजारपेठेत नागरिकांची लगबग कमी झाली. याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे हा संप लवकरात लवकर मागे घेतला जावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप