शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘कुडाळ’साठी ७३ टक्के मतदान

By admin | Updated: April 18, 2016 01:20 IST

निवडणूक प्रक्रिया शांततेत : आज दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ७३ टक्के मतदान झाले असून, १२ हजार ६७ मतदारांपैकी आठ हजार ८८२ मतदारांनी हक्क बजाविला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही. मतमोजणीनंतर आज, सोमवारी लागणाऱ्या नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडली. १७ प्रभागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते. १७ मतदान केंद्रे्र होती. मतदारांनी सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दुपारी कडक उन्हामुळे मतदार घराबाहेर पडले नव्हते. सायंकाळी उशिरा मतदानाचा ओघ पुन्हा वाढला. मतदानादिवशी कुडाळ शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. तसेच जास्तीतजास्त पोलिस कुमकही संवेदनशील मतदान केंद्रांवर लावण्यात आली होती. (प्रतिनिधी)राजकीय पुढाऱ्यांची धावपळरविवारी फक्त कुडाळची निवडणूक असल्याने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी हे कुडाळमध्ये ठाण मांडून बसले होते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती.सत्ता कुणाची ते आज कळणार कुडाळ नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार याची चर्चा शहरात सुरू होती. आज, सोमवारी मतमोजणी असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत येथील सर्व चित्र स्पष्ट होईल. ही मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.त्रिशंकू होण्याची शक्यताकुडाळ नगरपंचायतीवर कोणा एकाचीच सत्ता येणार नसून, कुडाळमध्ये त्रिशंकू स्थिती राहील, अशी चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये जोरदार सुरू आहे.प्रभाग क्र.१ मध्ये सर्वाधिक मतदान या निवडणुकीत प्रभाग क्र. १ कविलकाटे येथे ८१.५७ टक्के सर्वाधिक, तर प्रभाग क्र. ११ वाघसावंत टेंब येथे ६४.५२ टक्के एवढे कमी मतदान झाले.