शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजर तस्करांना ७ दिवसांची  वन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:00 IST

मुंबई -गोवा महामार्गावर असलदे पुलानजीक अतिदुर्मिळ असलेल्या जिवंत खवले मांजराची तस्करी करताना ५  जणांना सोमवारी  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन  विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर असलदे पुलानजीक अतिदुर्मिळ असलेल्या जिवंत खवले मांजराची तस्करी करताना ५  जणांना सोमवारी  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन  विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत रंगेहात पकडले होते.   या खवले मांजर तस्करांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता १५ एप्रिल पर्यंत  वन कोठडी सुनावण्यात आली आहे.      

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वन  विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे  नरुद्दीन कादिर शिरगावकर, सचिन पांडुरंग घाडीगांवकर, गणपत सत्यवान घाडीगांवकर, प्रकाश शांताराम गुरव या चौघांना सोमवारी दुपारी जिवंत खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती.  तर पाचवा आरोपी प्रवीण श्रीधर गोडे हा कारवाईच्या वेळी पसार झाला होता.      

   मात्र, वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांनी सापळा रचत सायंकाळी प्रवीण गोडे याच्याही मुसक्या आवळल्या होत्या.  या पाच आरोपींपैकी नरुद्दीन शिरगावकर हा  १ नंबरचा आरोपी आहे.  नरुद्दीन शिरगावकर व प्रवीण गोडे यांनीच खवले मांजराच्या विक्रीबाबत  आर्थिक बोलणी केली होती . तर प्रकाश गुरव याने खवले मांजर पकडले होते . असे वन विभागाच्या तपासात आता स्पष्ट झाले आहे. या पाच आरोपींव्यतिरिक्त आणखिन  एक आरोपी पसार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.       अटक करण्यात आलेल्या पाच तस्कराना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.   हे सर्व आरोपी एकमेकांना कसे ओळखतात ?  त्यांनी खवले मांजर कसे पकडले ?खवले मांजर  पकडण्यासाठी कोणते हत्यार अथवा जाळे वापरले ? ते खवले मांजर कोणाला विकणार होते ? आंतरराष्ट्रीय तस्करांशी या आरोपींचे कनेक्शन आहे का ? खरेदीदारांशी आरोपींनी आर्थिक व्यवहार केलाय का ?आर्थिक व्यवहार केला असल्यास किती रक्कम घेतली ? घेतलेली रक्कम कुठे ठेवली ?आदी मुद्यांचा तपास करण्यासाठी  न्यायालयाकडे आरोपींची वनकोठडी मागण्यात आली होती .                 यावेळी सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. त्यामुळे  कणकवली येथील  न्यायालयाने खवले मांजर तस्कराना  ७ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर  पुढील तपास करीत आहेत. खवले मांजर 

टॅग्स :forest departmentवनविभाग